"एका वृत्तवाहिनीनं दाखवलेल्या क्लिप्सची सत्यता पडताळावी"; भाजप नेते किरीट सोमय्यांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र
Kirit Somaiya Letter to Devendra Fadnavis: भाजप नेते किरीट सोमय्या यांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र
BJP Leader Kirit Somaiya Letter to Devendra Fadnavis: भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. एका वृत्तवाहिनीनं दाखवलेल्या क्लिप्सची सत्यता पडताळावी, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कोणत्याही महिलेवर अत्याचार केले नसल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या पत्रातून केला आहे.
काल (सोमवारी) किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांची एक आक्षेपार्ह्य व्हिडीओ क्लिप व्हायरल (Viral Video) होत होती. ही व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांच्यावर विविध आरोप केले जात होते. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Home Minister Devendra Fadnavis) पत्र लिहिलं आहे. एका वृत्तवाहिनीनं दाखवलेल्या क्लिप्सची सत्यता पडताळावी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी या पत्रातून केली आहे. तसेच, ही व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे आरोपही त्यांच्यावर केले जात आहे. यावरही किरीट सोमय्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, असं म्हणत किरीट सोमस्यांनी त्यांच्यावर होत असलेले, सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, यासर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्यांनी फडणवीसांकडे केली आहे.
पाहा व्हिडीओ : Kirit Somaiya Viral Video : 'त्या' व्हायरल व्हिडीओ संदर्भात किरीट सोमय्यांचं फडणवीसांना पत्र
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हणालेत किरीट सोमय्या?
किरीट सोमय्या यांनी पत्रात म्हटलं आहे की, "एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली आहे. या निमित्तानं अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले असून आक्षेपही घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असंही सांगण्यात आलं आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत."
"माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडीओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडीओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे.", असं किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.