Maharashtra New Task Force : राज्यात कोविडसाठी आता नवीन टास्क फोर्स सज्ज, डॉ. सुभाष सांळुखे अध्यक्ष
Covid New Task Force: कोरोनाच्या संकाटावर मात करण्यासाठी देशात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. राज्यात आता पुन्हा वाढत्या कोरोनावर आळा घालण्यासाठी नवे टास्क फोर्स नेमण्यात आले आहे.
Covid New Task Force : राज्यात पुन्हा आता कोरोनाने कोरोनाच्या (Covid 19) डोकं वर काढलं आहे. मृत्यूचे प्रमाण कमी असले तरीही दररोज निदान होणाऱ्या रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात आरोग्य विभागाकडून नवे टास्क फोर्स सज्ज करण्यात आले आहे. या टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष सांळुखे यांची निवड करण्यात आली आहे. तर या टास्क फोर्समध्ये क्लिनिकल डॉक्टरांचा समावेश करण्यात आलेला नाही. विशेष बाब म्हणजे आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांची केवळ सदस्यपदी बोळवण करण्यात आली आहे.
परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जुन्या सदस्यांना नव्या टास्क फोर्सबाबत काहीच कळवलं नसल्याने खासगी आरोग्य क्षेत्रातील डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता नव्या टास्क फोर्स समोर कोणती आव्हानं निर्माण होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
नव्या टास्क फोर्स कोणाकोणाचा समावेश?
या टास्क फोर्सचे नवे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे, निवृत्त महासंचालक, आरोग्य सेवा, पुणे हे आहेत.
तर सदस्य यादीत ही नावे आहेत:
लेफ्ट. जन. माधुरी कानिटकर, कुलगुरु, एम.यु.एच.एस., नाशिक
डॉ. बिशन स्वरुप गर्ग, प्रोफेसर, एम.जी.एम.एस., सेवाग्राम, वर्धा
डॉ. रमण गंगाखेडकर, माजी प्रमुख, आयसीएमआर
डॉ. राजेश कार्यकर्ते, बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे
डॉ.वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेज, पुणे
डॉ. संजय झोडपे, अध्यक्ष, पीएचएफआय, नवी दिल्ली
डॉ. हर्षद ठाकूर, प्रोफेसर, टीआयएसएस, मुंबई
डॉ. रघुनाथ भोये, अतिरिक्त संचालक, राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे
एप्रिल 2020 मध्ये पहिल्या टास्क फोर्सची स्थापना
कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले. देशात, राज्यात कोरोनाने हा:हाकार माजवला. या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य विभाग कंबर कसून कामाला लागले. पण या परिस्थितीत आरोग्य विभागाला तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाची गरज होती. अशा वेळी महाराष्ट्रात 2020 एप्रिलमध्ये पहिले टास्क फोर्स (Task Force) स्थापन करण्यात आले. या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक होते तर त्यांच्यासोबत सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टरांची टीम तयार झाली.
टास्क फोर्सचे नक्की काम काय?
या टास्क फोर्सचे नक्की काम काय हा प्रश्न आता नक्कीच पडला असेल. तर हे टास्क फोर्स कोविडच्या प्रार्दुभावाचे अभ्यासात्मक विश्लेषण करुन त्यावर उपाययोजना सुचवते. तसेच त्यावर मार्गदर्शन देखील करते.
टास्क फोर्सची महत्त्वाची कामे
- गंभीर आणि अतिगंभीर आजारी कोविड-19 रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापना करणे.
- कोविड-19 क्रिटिकल केअर रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे.
- गंभीरपणे आजारी कोविड-19 रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषधांची शिफारस करणे
- टास्क फोर्सने केलेल्या शिफारशींचा अहवाल सदस्य सचिव यांनी शासनास वेळोवेळी कळवण्यात येतो.
संबंधित बातम्या