NEET-UG परीक्षेचे समुपदेशन पुढील आदेशापर्यंत स्थगित, सर्वोच्च न्यायालयात 8 जुलैला सुनावणी
समुपदेशनाच्या कोणत्याही नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या नसून सर्वोच्च न्यायालयात नीट परीक्षेबाबत 8 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
NEET-UG counselling News: वैद्यकीय शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या NEET-UG परीक्षेचे समुपदेशन पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत 8 जुलैला सुनावणी होणार आहे. दरम्यान ही समुपदेशनाची प्रक्रिया आज सुरू होणार होती, पुढील आदेशापर्यंत ती थांबवण्यात करण्यात आली आहे.
दरम्यान नीट परीक्षा घेणाऱ्या 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'नेही( NTA )हा निर्णय व्यापक जनहिताविरोधात असेल असे म्हटले. तसेच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कारकिर्दीला धक्का बसण्याची भीती एनटीएने व्यक्त केल्यामुळे यंदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर पुनर्परीक्षेची टांगटी तलवार अजूनही लटकत आहे.
केंद्राचे सुप्रीम कोर्टाला नीट युजी रद्द न करण्याबाबत प्रतीक्षापत्र
केंद्र सरकारने काल नीट परीक्षा रद्द करणे योग्य नसून हा प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर आज नीट-युजीसाठीचे समुपदेशन स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान यंदाची नीट युजी परीक्षा रद्द करून पुन्हा घ्यावी, तसेच परीक्षेमधील अनियमिततेचा सुप्रीम कोर्टाच्या देखरेखी खाली तपास करावा अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका ही सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत.
देशभरातील विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
5 मे रोजी झालेल्या वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या नीट युजी परीक्षेतील गैरप्रकारानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. याचे कनेक्शन महाराष्ट्राशीही असल्याचे तपासानंतर उघड झाले आहे. दरम्यान, पेपर फुटीसह विविध आरोपांमुळे देशातील विविध शहरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
विद्यार्थ्यांचा संभ्रम कधी होणार दूर?
समुपदेशनाच्या कोणत्याही नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या नसून सर्वोच्च न्यायालयात नीट परीक्षेबाबत 8 जुलै रोजी सुनावणी होणार असल्याने विद्यार्थ्यांचा संभ्रम त्यानंतर कमी होण्याची शक्यता आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI