एक्स्प्लोर

Sharad Pawar vs Ajit Pawar : पवार वि. पवार, निवडणूक आयोगात घमासान, दुखऱ्या नसेवर दादागटाचं बोट, 10 मोठे मुद्दे!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Symbol) पक्ष आणि चिन्हाच्या लढाईत (NCP Crisis) पहिली सुनावणी आज निवडणूक आयोगात (Election commission) झाली. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) स्वत: उपस्थित होते.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Symbol) पक्ष आणि चिन्हाच्या लढाईत (NCP Crisis) पहिली सुनावणी आज निवडणूक आयोगात (Election commission) झाली. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) स्वत: उपस्थित होते. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून एकही नेता यावेळी उपस्थित नव्हता. अजित पवार गटाकडून मनिंदर सिंह (Maninder Singh ) यांनी जोरदार युक्तिवाद केला. अजित पवार गटाने सर्वात आधी जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा केला. शिवाय सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा आम्हाला आहे, त्यामुळे आम्हीच खरा पक्ष आहोत, असा सर्वात मोठा दावा अजित पवार गटाने केला. 

अजित पवार गटाने आमदारांच्या संख्येचा दाखला देताना नागालँडमधील आमदारांची संख्याही दाखवली. आमच्याकडे 55 आमदार आणि 2 खासदार आहेत, असा दावा अजित पवार गटाने केला.  शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा सर्वात मोठा आक्षेप अजित पवार गटाने केला. 

Sharad Pawar vs Ajit Pawar : निवडणूक आयोगातील सुनावणीतील मोठे मुद्दे 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कुणाला याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी झाली

दुपारी चारच्या सुमारास निवडणूक आयोगातील सुनावणीला सुरुवात

स्वत: शरद पवार सुनावणीसाठी निवडणूक आयोगात दाखल

शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, जितेंद्र आव्हाडही उपस्थित 

अजित पवार गटाकडून सुनावणीसाठी कोणीही उपस्थित नाही 

अजित पवार गटाकडून पक्ष घटनेचा दाखला 

कोणत्याही नियुक्त्या एका पत्राद्वारे कशा होऊ शकतात, अजित पवार गटाचा युक्तिवाद

24 पैकी 22 राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमच्या बाजूने हा शरद पवार गटाचा दावा अजित पवार गटाकडून खोडण्याचा प्रयत्न 

आमदारांची संख्या आमच्या बाजूने, अजित पवार गटाचा दावा 

महाराष्ट्र आणि नागालँडचेही आमदार आमच्या बाजूने, अजित पवार गटाचा युक्तिवाद 

पक्षाचा राष्ट्रीय दर्जा निघून गेला, त्यामुळे आमदारांची संख्या हाच महत्त्वाचा मुद्दा - अजित पवार गट

जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर, अजित पवार गटाचा सर्वात मोठा दावा 

 पक्षाची स्थापना कशी झाली? पक्षाचं काम कसं चालतं या संदर्भात अजित पवार गटाचा युक्तीवाद

55 आमदार आणि 2 खासदारांचा आम्हाला पाठिंबा, अजित पवार गटाचा दावा

महाराष्ट्र विधानसभेचे 53 पैकी 42, विधानपरिषदेचे 9 पैकी 6 आणि नागालँडमध्ये 7 पैकी 7 असे 55 आमच्या पाठिशी, तर लोकसभेत 5 पैकी 1 आणि राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदार आमच्यासोबत आहे - अजित पवार गट 

 पक्षाच्या घटनेचे पालन व्यवस्थित होत नाही. केवळ एका पत्राद्वारे पक्षात नियुक्त्या कशा प्रकारे होऊ शकतात - अजित पवार गटाचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला आहे. त्यामुळे आमदारांची संख्याच आता महत्त्वाची आहे. त्याआधारेच पक्ष कोणाचा? हे ठरवता येईल, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला आहे.

एक गट आम्हाला सोडून बाहेर पडला, पण मूळ पक्ष आमचाच, शरद पवार गटाचा प्रतिदावा 

आमदार सोडून गेले असले तरी पक्षावरचा दावा आमचाच योग्य आहे- शरद पवार गट

शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा सर्वात मोठा आक्षेप अजित पवार गटाने केला. 

राष्ट्रवादीवर अजित पवार गट दावा करू शकत नाही, शरद पवार गटाकडून युक्तिवाद

मुख्य प्रतोद आमच्या बाजूने, त्यामुळे  9 आमदारांवरील कारवाईचं पत्र बेकायदेशीर - अजित पवार गट 

सर्वाधिक अधिकार शरद पवारांकडे त्यामुळे अजित पवार पक्षावर दावा करु शकत नाही - शरद पवार गट

शरद पवारांची अध्यक्षपदी निवड ही बेकायदेशीर- अजित पवार गटाचा मोठा दावा 

10 आणि 11 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये बैठक. पण त्याच्या आधी 1 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत ते आधीच जाहीर झालं होतं, केवळ औपचारिकता म्हणून 10 सप्टेंबरची निवड झाली का? - अजित पवार

588 जणांच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड ही शरद पवारांनीच केली होती. 

राष्ट्रीय अध्यक्ष आणि इतर निवडी या लोकशाहीला धरून नाहीत, अजित पवार गटाचा दावा.

शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड 10 सप्टेंबर 2022 च्या कथित कार्यकारणीत झाली, पण 1 सप्टेंबर च्या बैठकीचेच जे मिनिट्स आहेत त्यात हे होणारच होतं हे दिसतं. त्यामुळे ही निवड योग्य नाही -अजित पवार गटाचा दावा

ज्या 558 डेलिगेट्सच्या आधारे त्यांची निवड झाली ते सर्वच्या सर्व बेकायदेशीर आहेत. कारण राज्य नियुक्त्या घटनेप्रमाणे झालेल्या नाहीत.

निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका, शरद पवार गटाची मागणी

राष्ट्रवादीच्या वादावर निर्णय होईपर्यंत हे चिन्हं आमच्याकडेच द्या, ते गोठवू नका अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. 

संबंधित बातमी

NCP Crisis : राष्ट्रवादी कुणाची? घड्याळ कुणाचं? सुनावणीसाठी निवडणूक आयोगात शरद पवार दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange: विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा खास फॉर्म्युला, मराठा- मुस्लिम- दलित तिहेरी मोट बांधणार?
विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा खास फॉर्म्युला, मराठा- मुस्लिम- दलित तिहेरी मोट बांधणार?
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येणार, संजय राऊत म्हणतात, ईडी, सीबीआयचा दबाव आहे का?
राज ठाकरे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येणार, संजय राऊत म्हणतात, ईडी, सीबीआयचा दबाव आहे का?
महाविकास आघाडी 'या' तारखेपासून राेवणार प्रचाराची मुहूर्तमेढ, शरद पवार म्हणाले, राहूल गांधी,मी आणि शिवसेना मिळून..
महाविकास आघाडी 'या' तारखेपासून राेवणार प्रचाराची मुहूर्तमेढ, शरद पवार म्हणाले, राहूल गांधी, मी आणि शिवसेना मिळून..
Ravi Raja resigns: विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का,निष्ठावंत नेत्याचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का,निष्ठावंत नेत्याचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Wish Diwali Festival : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दिवाळीच्या शुभेच्छा!ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 30 October 2024MVa Prachacr Mohim : राहुल गांधींसह मविआतील नेत्यांची 6 नोव्हेंबरपासून प्रचार मोहीमSanjay Raut On BJP : भाजपला महाराष्ट्रात 50 जागाही मिळणार नाहीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange: विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा खास फॉर्म्युला, मराठा- मुस्लिम- दलित तिहेरी मोट बांधणार?
विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा खास फॉर्म्युला, मराठा- मुस्लिम- दलित तिहेरी मोट बांधणार?
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येणार, संजय राऊत म्हणतात, ईडी, सीबीआयचा दबाव आहे का?
राज ठाकरे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येणार, संजय राऊत म्हणतात, ईडी, सीबीआयचा दबाव आहे का?
महाविकास आघाडी 'या' तारखेपासून राेवणार प्रचाराची मुहूर्तमेढ, शरद पवार म्हणाले, राहूल गांधी,मी आणि शिवसेना मिळून..
महाविकास आघाडी 'या' तारखेपासून राेवणार प्रचाराची मुहूर्तमेढ, शरद पवार म्हणाले, राहूल गांधी, मी आणि शिवसेना मिळून..
Ravi Raja resigns: विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का,निष्ठावंत नेत्याचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का,निष्ठावंत नेत्याचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार
Maharashtra Politics: सोलापूरात निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का! निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी हाती घेतली 'तुतारी'
सोलापूरात निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का! निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी हाती घेतली 'तुतारी'
Devendra Fadnavis: 'शरद पवारांनी केली तर चाणक्यनीती मी केलं तर...', घरफोडीच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक भाष्य
'शरद पवारांनी केली तर चाणक्यनीती मी केलं तर...', घरफोडीच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक भाष्य
Supriya Sule : 'अजित पवारांचं वक्तव्य अत्यंत असंवेदनशील मी माफी मागते...', आर. आर. पाटलांवरील टीकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
'अजित पवारांचं वक्तव्य अत्यंत असंवेदनशील मी माफी मागते...', आर. आर. पाटलांवरील टीकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
प्रसिद्ध अभिनेत्रीची पर्स आणि सोनसाखळी चोरीला, दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी सर्वच हिसकावलं
प्रसिद्ध अभिनेत्रीची पर्स आणि सोनसाखळी चोरीला, दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी सर्वच हिसकावलं
Embed widget