एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'त्या' नेत्याने माझ्या भोळेपणाचा फायदा घेतला, मला 'उल्लू' बनवलं; 'तो' नेता कोण? 

Supriya Sule: राष्ट्रवादीच्या एका नेत्याने आपल्याला खोटं सांगितलं आणि भाजपमध्ये प्रवेश केला, सत्य समोर आल्यानंतर आपल्याला त्रास झाल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीच्या आधी भाजपची सत्ता असताना राष्ट्रवादीच्या एका नेत्याने माझ्या भोळेपणाचा फायदा घेतला, खोटंनाटं सांगून पक्ष सोडला, नंतर माहिती घेतली असता त्यानं मला 'उल्लू' बनवल्याचं स्पष्ट झालं असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी UNFILTERED by Samdish  या यूट्यूब चॅनेलला मुलाखत देताना ही माहिती दिली. त्या नेत्याने आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचं लक्षात आल्यानंतर खूप त्रास झाला असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याने खोटं कारण देत भाजपमध्ये प्रवेश केला, सुप्रिया सुळेंना फसवणारा 'तो' नेता कोण याची चर्चा मात्र आता सगळीकडे सुरू आहे.

तुम्हाला आयुष्यात कोणी धोका दिल्याची भावना कधी झाली का या प्रश्नावर उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी हे उत्तर दिलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "राष्ट्रवादीचा एक नेता, त्याच्या वडिलांप्रमाणे अनेक वर्षे राजकारणात होता. तो आपल्या कुटुंबातील एक सदस्यासारखाच होता. तो नेता राष्ट्रवादी सोडून जाणार असल्याची माहिती मला मिळाली. त्यानंतर मी त्याला फोन केला आणि त्याबद्दल विचारलं. त्यावर तो म्हणाला की, मला अशा-अशा अडचणी येत आहेत. मग मी त्यावर म्हणाले की, तुम्ही घरी या. तुम्हाला ज्या काही अडचणी येत असतील त्यावर विचार करू. पटलं नाही तर तुम्ही सोडून जा."

भाजपमध्ये गेलो नाही तर... 

खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलावल्यानंतर तो नेता घरी आला. त्याच्यासोबत तब्बल तीन तास चर्चा झाल्याचं सुप्रिया सुळे सांगतात. त्यावेळी भाजपमध्ये गेलो नाही तर आपल्याला आणि आपल्या वडिलांना जेलमध्ये जावं लागेल, आपल्याविरोधात मोठी केस उभी केली जाईल, अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्या नेत्याने सुप्रिया सुळे यांना सांगितलं. पण एवढी चर्चा झाल्यानंतर मला वाटत नाही की तू सोडून जावं, तशी काही गरज नाही असं सुप्रिया सुळे यांनी त्या नेत्याला सांगितलं. त्यानंतर तो नेता विचार करुन सांगतो असं सुप्रिया सुळेंना म्हणाला. 

मला उल्लू बनवल्याचं लक्षात आलं, सुप्रिया सुळेंची भावना 

ही गोष्ट 2019 सालची, ज्यावेळी राज्यात भाजपची सत्ता होती त्यावेळची असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आणि त्या नेत्याने पक्ष सोडताना सांगितलेल्या अडचणींबद्दल सुप्रिया सुळेंनी माहिती घ्यायला सुरुवात केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संबंधित मंत्रालयात फोन करुन मी त्या केसबद्दल माहिती घेतली. दहा दिवसांनंतर त्या खात्याच्या मंत्र्याचा मला फोन आला. त्या मंत्र्याने सांगितलं की, या केसची डीटेल्स देता येत नाही, पण या केसमध्ये काहीच दम नाही. 

तो नेता स्मार्ट, आपल्या भोळेपणाचा फायदा घेतला... 

या घटनेनंतर 'त्या' नेत्याने खोटं बोलून आपल्याला फसवल्याची भावना झाल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्या नेत्याने खोटंनाटं कारण सांगून पक्ष सोडला, माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आणि मला उल्लू बनवलं अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. 

तो नेता स्मार्ट आहे, खोट्या केसचं कारण देत त्याने आपल्या भोळेपणाचा फायदा घेतला, त्याने आपल्याला फसवलं आणि ही गोष्ट अत्यंत वेदनादायी होती असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. माझ्यासाठी लोक आणि मित्रत्वाचं संबंध हे सगळ्या गोष्टींहून अधिक महत्त्वाचं असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.  

तो नेता कोण? 

राज्यात 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी सांगितलेला तो नेता कोण याची चर्चा सुरू आहे. नाव जरी सांगितलं नसलं तरी तो नेता आणि त्याचे वडील राष्ट्रवादीत अनेक वर्षे होते अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. 

ही बातमी वाचा; 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget