एक्स्प्लोर

Majha Katta: शरद पवारांना असलेल्या सहानुभुतीच्या लाटेला कसं तोंड देणार? सुनील तटकरे म्हणाले... काळच हे ठरवेल 

Sunil Tatkare On Sharad Pawar : रोहित पवारांनी आम्हाला प्रश्न विचारण्याआधी त्यांनी पक्षासाठी काय केलंय ते सांगावं असं खासदार सुनील तटकरे म्हणाले. 

Sunil Tatkare On Majha Katta : शरद पवारांना असलेल्या लोकांच्या सहानुभुतीच्या लाटेला कसं उत्तर देणार हे काळच ठरवेल, काळाच्या ओघात याचं उत्तर मिळेल असं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष फुटला असं आम्ही मानत नाही, आम्हीच राष्ट्रवादी आहोत असंही ते म्हणाले. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

Sunil Tatkare On Sharad Pawar: पवारसाहेबांना असलेली सहानुभुती... काळच ठरवेल काय ते 

शरद पवारांना असलेल्या सहानुभुतीच्या लाटेला कसं तोंड देणार असा प्रश्न विचारला असता सुनील तटकरे म्हणाले की, आतापर्यंत अजित पवारांनी पक्षाची भूमिका ही स्पष्टपणेम मांडली. पवार साहेब ज्या वेळी केंद्रात मंत्री होते त्यावेळी दादांनी मेहनत घेतली. 2004 मध्ये 71 जागा मिळाल्या, 2009 मध्ये 64 जागा मिळाल्या. अजितदादांनी आताही त्यांची भूमिका ही जनतेसमोर मांडली आहे. काळ हे ठरवेल, काळाच्या ओघात याचं उत्तर मिळेल. 

Sunil Tatkare On NCP: पक्षावर दावा केला नाही... आम्हीच पक्ष

राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळी भूमिका घेत पक्षावर दावा लावणं कितपत योग्य आहे या प्रश्नावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात फूट पडली असं आम्ही म्हणत नाही. आम्हीच राष्ट्रवादी आहोत. तशी भूमिका आम्ही निवडणूक आयोगाकडे मांडली आहे. 

Sunil Tatkare On Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाणांमुळे आघाडीत बिघाडी

अजित पवार हे मुख्यमंत्रीपदासाठी भाजपसोबत गेले असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मनात आमच्याबद्दल नेहमीच आकस राहिला आहे. या आधी महाराष्ट्राने विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे मुख्यमंत्री पाहिले ज्यांनी आघाडीला सांभाळून घेतलं. पृथ्वीराज चव्हाण हे ज्या वेळी मुख्ममंत्री झाले त्यावेळी आघाडीत बिघाडी झाली ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्यामुळेच जनतेच्या मनात आघाडीबद्दल संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा फटका काँग्रेससोबत राष्ट्रवादीलाही बसला. 

निवडणुकीत किती जागा लढायच्या हे काही ठरलं नाही

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी 90 जागा लढवणार असं अजित पवारांनी म्हटलं आहे. त्यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, कुणी किती जागा लढवायच्या हे काही ठरलं नाही. पण येत्या काळात आम्ही एकत्र बसून हे ठरवू.

Sunil Tatkare On Supriya Sule: सुप्रिया सुळे बारामतीच्या उमेदवार असतील का? 

सुप्रिया सुळे या तुमच्या उमेदवार असतील का असा प्रश्न विचारल्यानंतर सुनील तटकरे म्हणाले की, हे आताच काही सांगू शकत नाही. निवडणुकीला अद्याप मोठा कालावधी आहे. त्यावर आताच काही बोलू शकत नाही. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं आहे. त्यामुळे त्याबद्दल आताच काही सांगणं योग्य ठरणार नाही. 

Ajit Pawar CM : अजित पवार कधी मुख्यमंत्री होणार 

सुनील तटकरे म्हणाले की, आज महायुती म्हणून आम्ही युतीत सामील झालो आहोत. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांचीच इच्छा आहे. पण ती लगेच काही सफल होईल हे मानण्याचं कारण नाही. आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे. 55-60 आमदार असणाऱ्या पक्षाचा व्यक्ती मुख्यमंत्री झाला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं कुणाला वाटलं होतं का? पण ते झाले. त्यामुळे अजितदादा मुख्यमंत्री होणं हा आताचा प्रश्न नाही. 

Sunil Tatkare On Rohit Pawar : रोहित पवारांनी बोलू नये

पक्षाने अजून काय द्यायचं बाकी राहिलंय अशा आशयाची सोशल मीडिया पोस्ट शेअर करत आमदार रोहित पवारांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या आधीपासून मी पवार साहेबांच्यासोबत आहे. तालुका अध्यक्षापासून ते प्रदेशाध्यक्षापर्यंत मी प्रवास केला. या काळात पक्षाने भरपूर दिलं. पण मीही त्यासाठी कष्ट केले. राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असताना कोकणात राष्ट्रवादी वाढवली. जे रोहित पवार आता प्रश्न विचारत आहेत त्यांचा जन्म त्यावेळी झाला होता का हे मला माहिती नाही. प्रश्न विचारावे, पण कुणी विचारावे हे पण समजले पाहिजे. आम्हाला प्रश्न विचारायच्या आधी रोहित पवारांनी पक्षासाठी काय केलं ते सांगावं. 

ही बातमी वाचा :

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget