एक्स्प्लोर

शरद पवार सभा घेत असतील तर त्यांच्या पाठोपाठ भाजप पोलखोल सभा घेणार : चंद्रकांत पाटील

मी 28 वेळा याबाबत बोललो आहे, मात्र आज पुन्हा एकदा शरद पवार खोटे बोलले आहेत त्यामुळे मला माध्यमांच्यासमोर यावं लागलं आहे असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोल्हापूर : ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणावरून राज्यभर बाजू मांडण्यासाठी राज्यभर सभा घेणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.मात्र जनतेला खोटं सांगण्यासाठी पवार साहेब सभा घेत असतील तर त्यांच्या पाठोपाठ राज्यभर भाजपकडून पोलखोल सभा देखील घेतल्या जातील,  असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. 

'खोटं बोल पण रेटून बोलं' याप्रमाणे शरद पवार केंद्राकडे बोट दाखवत बचाव करत आहेत. मात्र 16 वर्षे सोडली तर अनेक वर्षे केंद्रात आणि राज्यात देखील यांची सत्ता होती.  मग त्यावेळी घटनादुरुस्ती का करून घेतली नाही? असा सवाल चंद्रकांतदादा पाटील यांनी विचारला आहे.  देवेंद्र फडणवीस सरकारने जे आरक्षण टिकवले होते ते आरक्षण यांना टिकवता आले नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची यांची अजिबात इच्छा नाही, त्यामुळे शरद पवार अशी विधाने करत असल्याचे देखील चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे. याआधी मी 28 वेळा याबाबत बोललो आहे, मात्र आज पुन्हा एकदा शरद पवार खोटे बोलले आहेत त्यामुळे मला माध्यमांच्यासमोर यावं लागलं आहे असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

शरद पवार यांचं वय झालं नाही का?

राज्यपाल भगतसिंग कोशारी त्यांचं वय झाला आहे.त्यामुळे मी त्यांच्यावर बोलणार नाही,अशा पद्धतीचे वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की राज्यपाल यांचं वय झालं म्हणतात, तर पवार साहेब यांचं वय कुठे कमी आहे? त्यामुळे कुणी कुणाचं वय काढू नये, आमदारांच्या विषयावर कोर्टाने देखील सांगितलं आहे की तो राज्यपालांचा अधिकार आहे.

नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेने शह मिळत असेल तर तो त्यांचा प्रश्न 

केंद्र सरकारमध्ये नव्याने मंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात जिल्ह्यांमध्ये दौरा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील केंद्रामध्ये असणारे मंत्री दौरा करत आहेत. नारायण राणे हे मुंबईतून जनआशीर्वाद यात्रेस सुरुवात करत आहेत. त्यामुळे शिवसेनेला शह मिळत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. शिवसेनेला शह हा त्या जन आशीर्वाद यात्रेतील बाय प्रॉडक्ट असेल असे देखील चंद्रकांतदादा पाटील म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या :

Sharad Pawar : केंद्र सरकारने केलेली घटनादुरुस्ती म्हणजे OBC समाजाची फसवणूक : शरद पवार

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget