एक्स्प्लोर

Sharad Pawar On Nana Patole: काँग्रेसच्या निर्णयाचे अधिकार दिल्लीला, नागपूर-भंडाऱ्यात आल्याची माहिती नाही; शरद पवारांचा पटोलेंना टोला

Sharad Pawar On Nana Patole: शरद पवार चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधलाय.

Sharad Pawar On Nana Patole: गडचिरोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  (Nana Patole) यांच्या स्वबळाच्या लढण्याच्या नाऱ्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी खोचक प्रतिक्रिया दिलीय. आम्हाला सरकार आणि संघटनाही चालवायची आहे. काँग्रेसच्या निर्णयाचे अधिकार दिल्लीला होते. मात्र, ते नागपुर-भंडारा या भागात आल्याची माहिती नाही अशा शब्दात शरद पवारांनी नाना पटोलेंना टोला हाणलाय.

शरद पवार चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य करीत नाना पटोले यांच्यावरही टीकास्त्र सोडलंय. आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचं वक्तव्य करणाऱ्या नाना पटोलेंना त्यांच्या शैलीत उत्तर दिलंय. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणुका लढल्या पाहिजेत, असं शरद पवार यांनी म्हटलंय. तसेच आम्हाला सरकार आणि संघटनाही चालवायची आहे. काँग्रेसच्या निर्णयाचे अधिकार दिल्ली होते. मात्र ,आता ते नागपूर-भंडारा या भागात आल्याची माहिती नाही, अशा शब्दात पवारांनी नाना पटोलेंना जोरदार टोला लगावलाय. 

"काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर चालणारे पक्ष आहेत. सहकारी पक्षांबाबत बोलताना भान ठेवला पाहिजे. नाना पटोलेंनी लोकसभा आणि विधानसभा कशी जिंकली? हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या विचारांना तेथूनच प्रेरणा मिळालेली दिसते. ही विचारधारा अफवा आणि गैरसमज निर्माण करणारी आहे", असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्रातील अमरावती आणि मालेगावात झालेल्या आंदोलना दरम्यान उसळलेल्या हिंसाचारावर शरद पवारांनी भाष्य केलं. "त्रिपुरात काही घडलं तर त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र किंवा इतर राज्यांत उमटावी, असं मला वाटत नाही. राज्यात कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झालाय. या प्रकरणाद्वारे समाजासमाजात विद्वेष वाढवण्याचा प्रयत्न झाला", असंही पवारांनी यावेळी म्हटलं होतं.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
शाळा सुटताच मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून नको नको ते केले; मुंबईच्या माहिममधील हादरवणारी घटना, पीडितेसह आरोपीही अल्पवयीन
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Embed widget