Sharad Pawar : 'मिटने वाला मैं नाम नहीं…' शरद पवार यांची भर पावसात ग्रँड एन्ट्री, येवल्यात इतिहास घडणार?

Sharad Pawarछ शरद पवार आज येवला दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या मतदारसंघात जाणार आहेत. तिथं ते मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

abp majha web team Last Updated: 08 Jul 2023 11:31 PM
NCP Ajit Pawar: शरद पवारांना धक्का; पवारांसोबत कारमधून प्रवास करणारा आमदार अजित पवारांच्या गटात
NCP Ajit Pawar: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी मकरंद पाटील उपस्थित होते. मात्र, त्यानंतर शरद पवार यांच्या कराड दौऱ्यावेळी आपण शरद पवार यांच्यासोबत आहे असं त्यांनी सांगितलं होतं. Read More
Sharad Pawar : 'मिटने वाला मैं नाम नहीं…' शरद पवार यांची भर पावसात ग्रँड एन्ट्री, येवल्यात इतिहास घडणार?
Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) येवला दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा सातारा सभेची आठवण ताजी झाली आहे. Read More
Sharad Pawar: भाजपसोबत चर्चा झाल्या होत्या पण निर्णय कधीच झाला नाही : शरद पवार

Sharad Pawar: सत्ता मिळाली नाही म्हणून जर आमचे सहकारी जर सत्तेमध्ये गेले तर हरकत नाही. भाजपसोबत चर्चा झाल्या होत्या पण निर्णय कधीच झाला नाही, चर्चा झाल्या होत्या. 

Sharad Pawar : छगन भुजबळ 1999 पासून शरद पवारांसोबत? आज अचानक साथ सोडली, शरद पवारांकडून आज हल्लाबोल? 
Sharad Pawar : शरद पवारांनी (Sharad Pawar) भुजबळांचाच मतदारसंघ का निवडला यावरून खमंग चर्चा सध्या सुरू आहेत.  Read More
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अधिकाऱ्यांना तंबी! पहिल्याच जाहिर कार्यक्रमात महायुतीच्या कार्यकर्त्यांनाही कानमंत्र
Ajit Pawar in Gadchiroli : उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी शपथ विधीनंतरच्या पहिल्याच जाहीर कार्यक्रमातून अधिकाऱ्यांना जोरदार तंबी दिली आहे. Read More
Sharad Pawar: स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे मोठे अधिवेशन नाशिकमध्ये, त्यामुळे आजच्या सभेसाठी नाशिकची निवड : शरद पवार

Sharad Pawar: नाशिक सभेसाठी निवडले कारण  स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे मोठे अधिवेशन झाले आहे.नाशिकला मोठा इतिहास आहे. नाशिकला मोठी पार्श्वभूमी आहे त्यामुळे येथून सुरुवात केली आहे. नाशिकला  येताना लोकांचे चेहरे पाहून माझा आत्मविश्वास वाढला त्याचा आनंद आहे. 

Sharad Pawar : राष्ट्रवादी पक्षाची भूमिका  मांडण्यासाठी महाराष्ट्र दौरा करणार : शरद पवार

Sharad Pawar : महाराष्ट्रात  जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्यात राष्ट्रवादी पक्षाची भूमिका  मांडण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहे . मुंबईहून नाशिकला येताना अनेक ठिकाणी आमचे स्वागत झाले. 


 

Sharad Pawar Nashik : शरद पवार नाशिकमध्ये दाखल, आज पहिल्यांदा छगन भुजबळांविना स्वागत, कशी आहे सभेची तयारी? 
Sharad Pawar Nashik : शरद पवार (Sharad Pawar) नाशिकमध्ये दाखल झाले असून पहिल्यांदा छगन भुजबळांविना शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले आहे.  Read More
ढोलताशांच्या गजरात शरद पवारांचं नाशिकमध्ये स्वागत

Sharad Pawar Reached Nashik : शरद पवार यांचं नाशिकमध्ये आगमन झालं आहे. ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचं स्वागत केलं. त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड उपस्थित आहे. शरद पवार यांची आज दुपारी येवल्यात जाहीर सभा होणार आहे.

Sharad Pawar Nashik : शरद पवार नाशिकमध्ये दाखल, आज पहिल्यांदा छगन भुजबळांविना पवारांचे स्वागत 

Sharad Pawar Nashik : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नाशिकमध्ये दाखल झाले असून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून जंगी स्वागत करण्यात येत आहे. आज येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शरद पवार यांची जाहीर सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर ते आज नाशिकमध्ये दाखल झाले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदा शरद पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा शरद पवार हे नाशिकमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा छगन भुजबळ हे पवारांच्या स्वागताला येत असतात. मात्र आजच्या नाशिक दौऱ्याचे चित्र मात्र वेगळे पाहायला मिळत आहे. 

Yeola News: शरद पवार यांचे सभेसाठी येवल्यात तगडा पोलीस बंदोबस्त

Yeola News:  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज नाशिकच्या येवल्यात जाहीर सभा होणार आहे या सभेसाठी खबरदारीसह कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. एक अप्पर पोलीस अधीक्षक, दोन उपविभागीय अधिकारी, सहा पोलीस निरीक्षक, 15 सहायक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक, 100 पोलीस कर्मचारी, 25 गृहरक्षक दलाच्या जवानांसह तीन शीघ्र कृती दल व दोन राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आले. येवला शहरातील येणारे रस्ते व मध्यवर्ती भागासह सभास्थळी हा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Narendra Darade: शरद पवार यांची सभा दूरगामी परिमाण करणारी ठरेल: आमदार नरेंद्र दराडे

Narendra Darade:   येवल्यात शरद पवारांची भुजबळांविरोधात सभा आहे. या सभेला ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे आणि अपेक्ष आमदार किशोर दराडे सहकार्य करत आहेत. मतदारसंघात फक्त घोषणा होत असल्याने लोकांमध्ये नाराजी आहे, असा दावा नरेंद्र दराडेंनी केलाय. तसेच शरद पवार यांची सभा दूरगामी परिमाण करणारी ठरेल, असं आमदार नरेंद्र दराडे म्हणत आहेत.

Jitendra Awhad: 'बडवे असू तर मी आणि जयंत पाटील पक्ष सोडून जातो पण तुम्ही परत या', जितेंद्र आव्हाडांचं भावनिक आवाहन
Jitendra Awhad : आम्ही जर विठ्ठलाभोवतीचे बडवे असू तर आम्हाला यापुढे काहीही नको, मी दूर कुठेतरी निघून जातो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. Read More
Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांचे मुलुंड टोल नाका येथे जंगी स्वागत

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ नाशिककडे रवाना झाले असून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. नाशिककडे येत असताना मुलुंड परिसरात त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हाध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे, माजी नगसेवक नजीब मुल्ला, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

  Chhagan Bhujbal : भुजबळांच्या स्वागतासाठी 'कार्यकर्ते' नाशिकला रवाना

  Chhagan Bhujbal : कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ हे आज नाशिक येथे दाखल होत आहे..नाशिकच्या पाथर्डी फाटा येथे मंत्री भुजबळ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर येवला मतदार संघातील ' भुजबळ संपर्क ' कार्यालय येथून भुजबळ समर्थक कार्यकर्ते हे या स्वागत सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाशिककडे रवाना झाले आहे.विकासपुरुष छगन भुजबळ हाच आमचा पक्ष आहे, ते जिकडे जातील तिकडे आम्ही त्यांच्यासोबत राहू अशी प्रतिक्रिया व भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. 

  Chhagan Bhujbal : मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये

  Chhagan Bhujbal : मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. यासाठी भुजबळांचे निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्मचे रुपडेच पालटले असून जणू दिवाळीच्या सणाप्रमाणे संपूर्ण तयारी केली जाते आहे. कुठे साफसफाई सुरू आहे तर कुठे फुलांची तोरणं ठिकठिकाणी लावली जातायत. स्वागताची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून दुपारी दोन वाजता पाथर्डी फाटा परिसरात 10 हजार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात भुजबळांचं स्वागत केले जाणार आहे.  

Sharad Pawar: 'कितीही मांजरे आडवे गेली तरी सभेला गर्दी होणारच': माणिकराव शिंदे

Sharad Pawar: शरद पवारांच्या येवल्यातील सभेची गर्दी कमी करण्याचा छगन भुजबळांचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी केलाय. 'कितीही मांजरे आडवे गेली तरी सभेला गर्दी होणारच' असं सांगत सभेला गर्दी होणारच, असा दावा माणिकराव शिंदे यांनी केलाय.  

Sharad Pawar in Thane : शरद पवारांचे ठाण्यात कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

Sharad Pawar in Thane : शरद पवार आज येवला दौऱ्यावर निघाले आहेत. ठाण्यातील आनंद नगर टोलनाक्याजवळ जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांकडून पवारांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. आव्हाड आणि अनेक कार्यकर्ते पवारांच्या ताफ्यात सामिल झाले, आणि मग हा ताफा येवल्याकडे निघाला. शरद पवार दुपारी एकच्या सुमाराला नाशिकला पोहोचतील, तिथून दुपारी दोन वाजता ते येवल्याच्या दिशेनं निघतील. 

Sharad Pawar Nashik : पवार आणि भुजबळांच्या बॅनरवर एकेमकांचे फोटो, नेमकं कोण कोणासोबत, कार्यकर्ते संभ्रमात! 

Sharad Pawar Nashik : आज नाशिक शहरासह येवल्यात राष्ट्रवादीत आमनेसामने पाहायला मिळत असून नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ यांचे शहरात स्वागत होणार आहे तर शरद पवार यांची सायंकाळी जाहीर सभा येवल्यात होत आहे. या दोन्ही गटाकडील नेत्यांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. दोन्ही गटाच्या बॅनरवर शरद पवारांसह भुजबळांचे फोटो पाहायला मिळत आहे. तर येवल्यातील भुजबळांचे बॅनर सकाळी लावल्यानंतर सायंकाळी काढण्यात आले आहेत. मात्र या डिजिटल फलकामुळे कार्यकर्ते मात्र आजही संभ्रमात असल्याचे चित्र आहे. 

Sharad Pawar:    शरद पवार येवल्याकडे रवाना, ठिकठिकाणी झालं जंगी स्वागत

Sharad Pawar:   राज्यातल्या राजकीय महाभूकंपानंतर आज नाशिकच्या येवलामध्ये राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची सभा, संध्याकाळी 4 वाजता सभा. शरद पवार येवल्याकडे रवाना. ठिकठिकाणी झालं जंगी स्वागत.


 





शरद पवारांना विठ्ठल संबोधनं तात्काळ थांबवा, अन्यथा... तुषार भोसलेंचा रोहित पवारांना इशारा

Rohit Pawar:  शरद पवारांना विठ्ठल संबोधने तात्काळ थांबवा, नाहीतर रस्त्यावर उतरु असा इशारा भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी रोहित पवारांना दिला आहे. 

Chhagan Bhujbal Nashik : छगन भुजबळ यांचं नाशिकमध्ये आज जोरदार शक्तिप्रदर्शन

Sharad Pawar Nashik : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ आज प्रथमच नाशिकमध्ये येत आहेत. एवढंच नाही तर जोरदार शक्तिप्रदर्शन करत ते राष्ट्रवादीच्या नाशिक कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, मुंबई ते नाशिक या प्रवासात त्यांचं ठाणे, शहापूर, इगतपुरी आणि पाथर्डी फाटा येथे जल्लोषात स्वागत करण्यात येईल. तर इगतपुरी आणि पाथर्डी फाटा येथे त्यांची स्वागत रॅली निघणार आहे. 

Jitendra Awhad: आम्ही बडवे असू तर आम्ही बाजूला पडू :आव्हाड

Jitendra Awhad:  राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला भावनिक आवाहन केलंय. तुम्ही सगळे परत या, मी आणि जयंत पाटील पक्ष सोडून जातो, असं भावनिक विधान आव्हाडांनी केलंय. आम्ही जर विठ्ठलाभोवतीचे बडवे असू तर आम्हाला यापुढे काहीही नको, मी दूर कुठेतरी निघून जातो, असंही ते पुढे म्हणाले. शरद पवारांचं स्वागत करण्यासाठी ते ठाणे टोलनाक्याजवळ आले होते.. तिथे माध्यमांशी बोेलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

Sharad Pawar: शरद पवारांच्या स्वागतासाठी मुंबई नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी गर्दी

Sharad Pawar: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार हे नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघात सभेचे आयोजन करण्यात आले असून सभेसाठी शरद पवार जाणार आहेत. मात्र मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी  बायपास तसेच शहापूर भागात ठिकठिकाणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी  राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वागतासाठी गर्दी केली आहे

पार्श्वभूमी

NCP Political Crisis: राष्ट्रवादीत बंड करुन  नाशिकचे आमदार छगन भुजबळांनी भाजप शिवसेनेसोबत घरोबा केला. आणि त्याला उत्तर म्हणून शरद पवार आता बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत.   पवारांची पहिली सभा छगन भुजबळांच्या येवल्यात होणार आहे.


शरद पवार आज येवला दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या मतदारसंघात जाणार आहेत. तिथं ते मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहेत. पवारांच्या सभेला शह देण्याचा छगन भुजबळ यांच्याकडून प्रयत्न आहे. दरम्यान दुसरीकडे पवारांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर येवल्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे.  शरद पवारांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर अजित पवार, छगन भुजबळ यांचेही फोटो आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर माणिकराव शिंदे यांचाही फोटो लावण्यात आलाय.. त्यामुळे नेमकं कोण कोणासोबत आहे.. असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलाय आहे. 


महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वी ज्या पद्धतीने शिवसेना (Shivsena) फुटून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्याच घटनेची अजित पवारांनी घडवून आणली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत छगन भुजबळ यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेटपदी निवड झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे प्रथमच नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहे. शनिवार 8 जुलैला दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांचे पाथर्डी फाटा, नाशिक येथे आगमन होणार आहे. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. 


अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी (Maharashtra NCP) पक्षात मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईत पार पडलेल्या बैठकीतून अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार टीकाही केली. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे जाहीर करत सुरवात नाशिक जिल्ह्यापासूनच करणार असल्याचे देखील जाहीर केले. त्यानुसार शरद पवार उद्या 8 जुलै रोजी येवला (Yeola) येथील बाजार समिती आवारात जनेतला संबोधित करणार असून येवला म्हणजे भुजबळांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्याच येवल्यात उद्या शरद पवार भुजबळांचा समाचार घेणार आहेत. तर दुसरीकडे या सभेच्या पूर्वी छगन भुजबळ यांचे नाशिक शहरात जंगी स्वागत करण्यात येणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेतलेले छगन भुजबळ उद्या नाशिकमधे येणार असून शरद पवार भुजबळ यांच्या बालेकिल्लात सभा घेत असतानाच छगन भुजबळ शक्ती प्रदर्शन करणार आहेत. दुपारी दोन वाजता नाशिकमधे भव्य स्वागत होणार असून पवारांच्या सभेला शह देण्याचा छगन भुजबळ यांच्याकडून शह देण्याचा प्रयत्न असणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.