आमचे शूटर लावले आहेत... जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबीयांना मारण्याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल
Jitendra Awad : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावायाला मारण्याबाबतची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awad ) यांच्या कुटुंबीयांना मारण्याबाबतची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला मारण्याचा उल्लेख करण्यात आलाय. आव्हाड यांची मुलगी नताशा आणि जावई यांचा स्पेनमधील पत्ता शोधला असल्याचा ऑडिओमध्ये उल्लेख आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाणे पालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा हा ऑडियो व्हायरल झाला आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल आपण कोणतीही तक्रार दाखल करणार नसल्याचे म्हटले आहे.
"माझ्या मुलीला आणि जावायाच्या घराजवळ काही तरी कांड करून त्यांना मारण्यात येणार असल्याचे या क्लिपमध्ये म्हटले आहे. हे सर्व बाबाजींच्या जीवावर करत आहे, असे या क्लिपमध्ये म्हटलं असल्याचे आव्हाड यांनी एबीपी माझासोबत बोलताना सांगितले. क्लिपमध्ये उल्लेख केलेले बाबा म्हणजे अंडर वर्ल्डमधील सुभाषसिंह ठाकूर हे एक नावाजलेलं नाव होतं. त्याचं नाव क्लिपमध्ये घेण्यात आलं आहे, असं आव्हाड यांनी सांगितलं. या क्लिपमध्ये बोलणारा माणूस महेश आहे हे मला माहिती आहे. मी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करणार नाही. कारण तक्रार दाखल करुनही काही होत नाही. फक्त चौकशीच्या नावांवर पोलीस काहीही करत नाहीत आणि आरोपी आपल्यासमोर फिरत असतो. मग तक्रार दाखल करुन तरी काय होणार? असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महेश आहेर यांना जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून आहेर यांना मारहाण करण्यात येण्याची शक्यता आहे. परंतु, याबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.
काय म्हटलं आहे क्लिपमध्ये?
महेश आहेर : माझे प्रोटेक्शन काढले ना... मी त्यांना मेसेज केला
सीएमने त्यांना रात्री पावणे बाराला फोन केला होता. मला ही त्याचा मेसेज आला होता. सीपींना... एकनाथ शिंदे यांना सगळ्यांना पाठवून रेकॉर्ड करून ठेवलं आहे. की, आव्हाड आता माझ्या विरूध काहीही करेल. म्हणजे एक क्रिएट करून ठेवलं आहे एक बॅकग्राऊंडला. मी का करून ठेवलंय...कारण मला राग आहे जितेंद्र आव्हाड या नावाचा.
मी आमचे शुटर लावले आहेत बाबाजीला सांगून स्पेनला... हिचा पत्ता शोधला नताशाचा. तो जावई ठाण्यात नाही आला आणि त्याच्या बापाला किंवा कोणाला अटॅक केला ना की तो एक दिवसांसाठी येईल. एअरपोर्टपासून फिल्डींग लावेन, सांगतो माझं पुढचं प्लॅनिंग सांगतो. यांनी जरा जरी त्रास दिला तर मी एकदम शातीर आहे. तो असा नाही आला ना पत्ता नाही भेटला तसा शोधून काढला आहे. एरियाचा मिळाला आहे मला. स्पेन काय इंडिया एवढं मोठ नाहीये. येथे विकास कॉम्प्लेक्सचा पत्ता आहे माझ्याकडे. येथे एक कांड केला ना तो आईबापाच्या ओढीने लगेच येईल रातोरात. मी एअरपोर्टवर पण फिल्डींग लावून ठेवली आहे. प्रत्येक याच्यावर आणि त्याची गेम करणार. याच्या पोरीला रडायला लावणार म्हणजे याला कळेल मुलींचं दु:ख काय असतं.
नाय त्याला कळू दे ना ओ साहेब...
समोरील व्यक्ती : भाई मी सांगतो पण तू अशी टोकाची भूमिका नको घेऊ
महेश आहेर : नाय मी भूमिका घेतली नाही. मी प्लॅनिंग करून ठेवलं आहे.
समोरील व्यक्ती : नको ना भाई
महेश आहेर : मी तेच करतो. जर काय अशी चाल नाय खेळलो तर असा खेळू, मी करून ठेवलंय. तो साप आहे. तो एवढं होऊन माझा झाला नाही. तो काय करेल. तो पुन्हा मला आयुष्यातून उठवायला बघेल. तो सत्तेत आला तर काहीही करेल. त्याने केलं तर मी हे तयार करून ठेवलं आहे संगळं. माल जीवे मारण्यासाठी करतात हे त्याला पण हे कळलं पाहिजे की, आपल्या मुलीलाही काही होऊ शकतं. तर तो आटोक्यात येईल.
सायकॉलॉजीकल सांगतो... तेव्हाच तो कंट्रोलमध्ये येईल. त्याला जेव्हा कळेल ना महेशच्या कधीच ... आपली फॅमीली उद्धवस्त होईल. तेव्हा त्याला कळेल महेश कुठल्या याच्यातून गेला आणि तेव्हा तो शांत होईल. त्याशिवाय तो नाग शांत होणार नाही. त्याला ठेचायचंच आहे मला...
समोरील व्यक्ती : महेश आपली मैत्री आहे बोलूयात ना आपण
महेश आहेर : माझे जावई आहेत ना ते मस्त आहेत.. ते माझ्याबरोबर .. आम्ही येथेच होतो.
समोरील व्यक्ती : कुठे राहायला
महेश आहेर : ठाण्यातच सगळ्यांना सर्व... डॉन आहे आमचा... 15 -20 लाख रूपये रोजचे वाटतो. वाटपचं तेवढं आहे. येतात तेवढे. बघा तो बॉडीगार्ड असतो तो म्हणाला दोन लाख रूपये घेऊन येतो. मी म्हटलं ऑफिसला ठेवून दे कोणाला तरी द्यायचे आहेत. साहेब माझी दहा माणसं कलेक्शन करतात रोज. याला विचाराल सुटकेस भरून बाबाजीकडून पैसे येतात.
इतर व्यक्ती : येथून घाटकोपर वरून ... मी येतो सोडायला... हा मीच येतो.. बॅगा येतात मला... 30-30, 40-40, 50-50 लाख रूपये मला वन स्ट्रोक येतात मला.
समोरील व्यक्ती : काम आहे तू करतोस ते...
महेश आहेर : काम करतो... मी नंतर नोकरी.. आधी.. काही इन्सीडन्स घडलं, किंवा रेग्युलल रिटायर्ड झालो तरी मी बाबाजीची गॅंग म्हणजे बाबाजी बोलला तू राहा लीलग प्रॉपर्टीचे काम कर माझ्यासाठी. मी बाबाजीसाठी काम करणार आहे.