एक्स्प्लोर

Jayant Patil : धोक्याची घंटा ओळखा, शेतकऱ्यांना मदत करा; शेतकरी आत्महत्येवरुन जयंत पाटलांची सरकारवर टीका 

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन (farmer suicide) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Ncp Leader Jayant Patil) यांनी राज्य सरकारवर टीका केलीय.

Jayant Patil : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन (farmer suicide) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Ncp Leader Jayant Patil) यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना जीवन संपवणे सोपे वाटले हेच सरकारचे अपयश असल्याचे पाटील म्हणाले. सरकारनं धोक्याची घंटा ओळखावी आणि शेतकऱ्यांना मदत करावी असेही ते म्हणाले. देश अमृतकाळ साजरा करत असताना शेतकरी आत्महत्या करत असल्याचे पाटील म्हणाले.  

शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिकच वाढत चालल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले आहे. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना आपले जीवन संपवणे सोपे वाटले हेच सरकारचे अपयश आहे अशी टीका त्यांनी केली. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. कर्ज काढून पिक लावणी केली. मात्र, अतिवृष्टीमुळं जमीन खरडून गेली. हाता तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आपले जीवन संपवणे सोपे वाटले, हे सरकारचे खरे अपयश असल्याचं जयंत पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

नऊ महिन्यांमध्ये विदर्भात एक हजार 584 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

गेल्या नऊ महिन्यांमध्ये विदर्भात एक हजार 584 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या 25 वर्षांतील ही सर्वाधिक संख्या असल्याचे जयंत पाटील यांनी ट्वीटमध्ये  म्हटलंय. देश अमृतकाळ साजरा करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी मात्र विष पिऊन आत्महत्या करत आहे. ही धोक्याची घंटा सरकारनं ओळखावी आणि शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करावी असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

सर्वत्र, गणेश आणि गौरी उत्सव सुरू आहे. अशात यवतमाळ जिल्ह्यात मात्र, गेल्या दोन दिवसात सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं जमीन खरडून गेली होती. शेतात घेतलेलं पीक हे निकामी होत असल्याचे पाहून पुढे जगावं कसं या विवंचनेतून शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जिल्ह्यातील नितीन भारत पाने (जामवाडी), प्रवीण काळे (हिवरी), त्र्यंबक केराम (खडकी), मारोती चव्हाण (शिवणी), गजानन शिंगणे (अर्जुना) आणि तेवीचंद राठोड (बाणगाव) या 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Farmer Suicide : औरंगाबाद हादरलं! एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या, दोघांनी विष तर एकाने घेतला गळफास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget