एक्स्प्लोर

Sharad Pawar: मुंबईत जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी...पुण्यात शरद पवार यांनी म्हटले की... 

Sharad Pawar : राज्यात तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असून हा  गैरवापर कसा होतोय हे दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले. 

Sharad Pawar On Jayant Patil ED:  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची मुंबईत ईडी चौकशी सुरू असताना दुसरीकडे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत भाजपवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 नेत्यांची आतापर्यंत तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग कसा सुरू आहे, हे राज्यातील जनतेने पाहिले असल्याचे पवार यांनी म्हटले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. तर, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर टीका केली. 
राष्ट्रवादीच्या 10 नेत्यांची आतापर्यंत चौकशी करण्यात आली आहे. अनिल देशमुखांना नाहक तुरुंगवास घडला. अनिल देशमुख 13 महिने तुरुंगात होते. त्यांच्यावर आरोप झालेली 100 कोटींची रक्कम दीड कोटींवर आली. ही दीड कोटींची रक्कम शैक्षणिक संस्थेला देणगीची असून त्यांना नाहक बदनाम करत तुरुंगात डांबले असल्याचे पवार यांनी म्हटले.  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबीर सिंह यांच्याविरोधात कितीतरी तक्रारी दाखल आहेत. त्याची यंत्रणांनी नोंद घ्यावी असेही पवार यांनी म्हटले. राज्यात तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असून हा  गैरवापर कसा होतोय हे दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले. 

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. त्यावरही पवार यांनी भाष्य केले. सीबीआयने चौकशी सुरू केल्यानंतर नवाब मलिक यांनी घेतलेली भूमिका सत्यावर आधारीत होती असे पवारांनी म्हटले. समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांची किंमत मलिकांना चुकवावी लागली असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे. 

मविआत जागा वाटप ठरले?

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यावर शरद पवार यांनी स्पष्टपणे भाष्य करताना म्हटले की, महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत कोणतीच चर्चा  झाली नाही. आगामी निवडणुका एकत्रपणे लढवायच्या यावर एकमत झाले आहे. तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य जागा वाटपांबाबत चर्चा करणार आहेत. त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास, उद्धव ठाकरे, मी (शरद पवार) आणि मल्लिकार्जुन खर्गे अथवा सोनिया गांधी हे निर्णय घेतील, असे सिल्वर ओकवरील बैठकीत ठरले असल्याचे पवारांनी सांगितले. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. या आघाडीत पहिल्या क्रमांकावरील पक्ष कोण दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष कोणता, याला महत्त्व नाही. माझ्यासाठी सगळेच महत्त्वाचे पक्ष आहेत, असेही पवार यांनी सांगितले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Donald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखीBeed Ashti Crime : मुलीचा HIVमुळे मृत्यू झाल्याती खोटी माहिती,कुटुंबाला गावाने टाकलं वाळीतCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 21 January 2025ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 21 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरला मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक! ट्रम्प ब्रँड भारतात आणणारे ते आहेत तरी कोण?
Pune Crime : दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
दारूच्या नशेत तरुणांचा बारमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांकडून दोघांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Beed Crime: बीडमध्ये मुलीचा हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत मृत्यू; डॉक्टर अन् पोलिसांची संशयास्पद भूमिका
बीडमध्ये आणखी एक भयंकर घटना, अनैसर्गिक अत्याचार अन् जबर मारहाणीत विवाहितेचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
Zomato Share : झोमॅटोचा शेअर 8 टक्क्यांनी आपटला, तिसऱ्या तिमाहीत नफा 57 टक्क्यांनी घटला, ब्रोकरेज हाऊसनं दिलं नवं टार्गेट
झोमॅटोचा तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट आला अन् शेअर 8 टक्क्यांनी आपटला, गुंतवणूकदारांना ब्रोकरेज हाऊसनं कोणता सल्ला दिला?
Embed widget