'मुख्यमंत्री असल्याचं मुख्यमंत्र्यांच्याच लक्षात राहत नाही तर काय कपाळ करावं'; शिंदेंची अॅक्टिंग करत अजितदादांचा हल्लाबोल
Ajit Pawar On CM Shinde : मुख्यमंत्री असल्याचं मुख्यमंत्र्यांच्याच लक्षात राहत नाही तर काय कपाळ करावं, अशी टीका राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
Ajit Pawar On CM Shinde : मुख्यमंत्री असल्याचं मुख्यमंत्र्यांच्याच लक्षात राहत नाही तर काय कपाळ करावं, अशी टीका राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. अहमदनगरमधील श्रीगोंदा येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. अजित पवार यांनी यावेळी भाषणात एकनाथ शिंदेंची अॅक्टिंग करत हल्लाबोल केला. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण मुख्यमंत्री असल्याचं लक्षात राहत नाही. ते कधीकधी भाषणात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणतात, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.
पाहा अजित पवार काय म्हणाले?
अजित पवारांची राज्य सरकारवर जोरदार टीका
गेल्या सहा महिन्यांचं सरकारचं काम पाहिलं तर या सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्तेची नशा, सत्तेची मस्ती, सत्तेची मग्रुरी गेलीये म्हणून ते बेताल वक्तव्य करतायेत...मी एकदा कधीतरी एक चुकीचं बोललो तर दिवसभर चव्हाण साहेबांच्या पुतळ्याजवळ बसलो, परत कधी असं चुकीचं बोललो नाही असं राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष अजित पवार यांनी म्हटलंय...ते श्रीगोंद्यातील पिंपळगावपिसा येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते...पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात सध्या अनेक नेत्यांकडून महापुरुषाबद्दल चुकीची वक्तव्य होत आहे त्याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी असं अजित पवार म्हणाले.
आमच्या सरकारच्या काळात नेहमी मागणी व्हायची एसटी महामंडळाला राज्य सरकारमध्ये सामावून घ्या, त्यासाठी सतत संप पुकारला जायचा...आता सहा महिने झाले तुमचं सरकार आलं आता तुम्हाला कुणी अडवलं असं म्हणत अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला...त्यावेळी कुठलेतरी वकील यायचे आणि म्हणायचे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, डंके की चोट पर कहुंगा...मग आता काय झालं असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली.
सध्या विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, खोट्या केसेस टाकून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे...जितेंद्र आव्हाड यांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला गेला... संजय राऊत यांच्या बाबत तर न्यायालयानेचं सांगितले की त्यांना कारण नसताना अटक केली...असं म्हणत अजित यांनी सरकारवर टीका केली.