संजय राऊत ठाकरेंच्या सर्कसचे जोकर, चार जूननंतर हकालपट्टी होणार, अजितदादांच्या राष्टवादीचा पलटवार
NCP on Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाने राऊतांवर पलटवार केला आहे.
NCP on Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज नाशिक येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार हे धमकी बहाद्दर आहेत. ते रोज सकाळी उठून आपल्या मतदारसंघात 10 लोकांना धमक्या देतात, अशी टीका त्यांनी यावेळी केली. संजय राऊतांच्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून (NCP Ajit Pawar Faction) खरपूस समाचार घेण्यात आला.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्कसमध्ये जोकर म्हणून संजय राऊत यांची भूमिका आहे. अजितदादांवर बोलण्याची संजय राऊत यांची लायकी नाही. संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन दिसून येतेय, की बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा पराभव होत आहे, अशी टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) प्रवक्ते प्रशांत पवार (Prashant Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर केली आहे.
संजय राऊतांना राष्ट्रवादीचे आव्हान
काही दिवसांत ठाकरे गटच संजय राऊत (Sanjay Raut) यांची हकालपट्टी करेल. संजय राऊत यांनी 4 जूनपर्यंत थांबावं, तुम्हाला कळेल. 4 जूननंतर संजय राऊत दिसणार नाही. नामर्द संजय राऊत यांचा धिक्कार करतो. यांच्यात धमक असेल तर खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी निवडणुकीत उभं रहावं, असं आव्हान संजय राऊत यांना प्रशांत पवार यांनी दिले आहे.
वैचारिक वक्तव्य तुम्हाला शोभत नाहीत - संजय राऊत
अजित पवार यांनी 2019 साली शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितले म्हणूनच भाजपसोबत गेलो होतो, असे म्हटले होते. यावर संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, हे अजून किती वेळा बोलणार, गुळगुळीत झाले आहे आता. आता दुसरे काहीतरी बोला. धमकी वगेरे द्या. अजित पवारांची (Ajit Pawar) ख्याती सध्या धमकी बहाद्दर अशी झालीय. दररोज उठून ते सध्या मतदारसंघात 10 लोकांना धमक्या देतात. हे असे वैचारिक वक्तव्य तुम्हाला शोभत नाहीत. अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी : मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांचा ताफा अडवला, मराठा बांधवांना न्याय देण्याची मागणी