एक्स्प्लोर
नक्षलवाद्यांचं अग्नितांडव, वट्टेपल्ली-गट्टेपल्ली मार्गावरील वाहनांची जाळपोळ
या जाळपोळीत 10 जेसीबी, 5 ट्रॅक्टर, 2 जीप जाळून खाक झाले, तर इतर अन्य छोट्या वाहनांची नासधूस केली. त्यानंतर नक्षली पसार झाले.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील वट्टेपल्ली-गट्टेपल्ली मार्गावर रस्ते कामावरील वाहनांची जाळपोळ केली आहे. या जाळपोळीत 17 वाहानं जाळून खाक झाली आहेत.
एटापल्ली तालुक्यातील वट्टेपल्ली- गट्टेपल्ली मार्गावर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालु आहे. यासाठी ट्रक, जेसीबी, जीप आणण्यात आले होते. तिथे काही मजूरही उपस्थित होते. शुक्रवारी रात्री नक्षलवाद्यांनी मजुरांना थांबवून ठेवलं. त्यानंतर नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केली. या जाळपोळीत 10 जेसीबी, 5 ट्रॅक्टर, 2 जीप जाळून खाक झाले, तर इतर अन्य छोट्या वाहनांची नासधूस केली. त्यानंतर नक्षली पसार झाले.
आजपासून नक्षल PLJA शहीद सप्ताह सुरु झाला आहे. त्यामुळे आता अधिक पोलीस बंदोबस्त घटनास्थळी रवाना करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
