एक्स्प्लोर

महाड दुर्घटनेतील शोधकार्य 13 दिवसांनंतर थांबवलं, आतापर्यंत 28 मृतदेह हाती

महाड : महाड दुर्घटनेत सावित्री नदीच्या पात्रात बुडालेल्या अपघातग्रस्त तवेरा कारचाही अखेर शोध लागला आहे. तवेरा बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असून कारमध्ये दोन मृतदेह सापडल्याची माहिती आहे.   दुर्घटना घडल्यानंतर तेराव्या दिवशी  MH04 GD 7837 या क्रमांकाच्या तवेराचा शोध लागला आहे. घटनास्थळापासून 300 मीटर अंतरावर गाडीचे अवशेष सापडले. तवेरा गाडीमध्ये आठ प्रवासी असल्याची माहिती होती. त्यापैकी काही प्रवाशांचे मृतदेह आधीच हाती लागले होते.   मंगळवारी 2 ऑगस्टच्या रात्री 11 वाजता तवेरा गाडीतून प्रवास करणाऱ्यांनी पोलादपूरमध्ये जेवण केलं होतं. तोपर्यंत प्रवाशांशी संपर्क झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. मात्र त्यानंतर तवेरातील प्रवाशांशी संपर्क तुटला होता.    

महाड दुर्घटनेत तवेरा कारमधील आठ जण बेपत्ता

    शनिवारीच जयगड-मुंबई ही दुसरी एसटी बस सापडली होती. दुर्घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर एसटी सापडली होती. वायर रोप आणि क्रेनच्या सहाय्याने रात्री उशिरा ही बस बाहेर काढण्यात आली.   चार दिवसांपूर्वी राजापूर-बोरीवली एसटी दुर्घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर सापडली होती. क्रेनच्या सहाय्याने ही एसटी सावित्रीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आली होती. दुर्घटनेला दहा दिवस लोटल्यानंतर बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांनी आशा सोडत परतीचा मार्ग धरला होता.     ब्रिटिशकालीन महाड-पोलादपूर पूर कोसळून दुर्घटना     रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुरात, मुंबई-गोवा महामार्गावरील, महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन पूल मंगळवारी  2 ऑगस्टच्या रात्री साडेअकरा वाजता वाहून गेला. या पुरात 2 बस आणि 7 ते 8 वाहनं वाहून गेले. यामधील 27 मृतदेह शोधण्यात जवानांना यश आलं होतं.   तवेरा कार बाहेर काढल्यानंतर त्यात दोन मृतदेह असल्याचं स्पष्ट झाल्यास हा आकडा 29 वर जाईल.   या दुर्घटनेत 42 जण वाहून गेल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती.   महाड आणि पोलादपूर या दोन शहरांना जोडणारा हा ब्रिटीशकालीन पूल होता. पुलावरुन जाणाऱ्या दोन एसटी बसेससह सात ते आठ वाहनंही वाहून गेली. वाहनांमध्ये राजापूर-बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बसेसचा समावेश आहे.   साधारणपणे 100 वर्षांपासून या पुलावरुन वाहतूक सुरु होती. कोकणाहून मुंबईकडे येणारी वाहनं या पुलावरुन जायची. मात्र, पुलाची दुरावस्था आणि कोकणात सुरु असणारा पाऊस यामुळे हा पूल मध्यरात्री वाहून गेला.   शोध आणि बचावकार्य   दुर्घटना झाल्यानंतर शोध आणि बचावकार्य जोरात सुरु आहे. एनडीआरएफ, नौदल, तटरक्षक दल, रेल्वे आदी विविध पथकाचे जवान शोधकार्य करत आहेत.

संबंधित बातम्या

महाड दुर्घटना : बुडालेली दुसरी एसटी बस सापडली

महाड दुर्घटना : बुडालेली एसटी बस सापडली

देवदूत… काळरात्री शेकडो जणांचा जीव वाचवणारा ढाण्या वाघ!

महाडचा ‘देवदूत’ बसंत कुमारचा राज ठाकरेंकडून सत्कार

महाड दुर्घटना: सावित्री नदीवर नेमकं काय घडलं?

LIVE : महाड पूल दुर्घटना : अंधुक प्रकाशामुळे बचावकार्य थांबलं

महाड पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करु: मुख्यमंत्री

महाड पूल दुर्घटना : दिवसभरात काय काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Embed widget