Navneet Rana vs Shivsena Live Updates : शिवसैनिकांच्या हल्ल्यात आपण जखमी झालो असा किरीट सोमय्यांचा आरोप
Navneet Rana vs Shivsena Live Updates : अमरावतीत शिवसैनिकांना गुंगारा देत राणा दाम्पत्य आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. तर मातोश्रीवर या आणि महाप्रसाद घेऊन जा असे शिवसैनिकांनी आव्हान दिले आहे.
LIVE

Background
Navneet Rana vs Shivsena Live Updates : राणा दाम्पत्याला मुंबईत जाऊ देणार नाही, असा निर्धार शिवसेनेने केला होता. मात्र तरीही अमरावतीमधील अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मुंबईत दाखल झाले आहेत. गनिमी काव्याने राणा दाम्पत्य आज पहाटे मुंबईत पोहोचलं आहे. परंतु ते कुठे आहे हे समजू शकलेलं नाही. शिवसैनिकांकडून त्यांचा शोध सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचं पठण केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे. या दोघांसोबतच युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्तेही मुंबईत पोहोचले आहेत. सकाळी रस्ते मार्गाने हे कार्यकर्ते मुंबईत आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना रोखण्यासाठी शिवसैनिक आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून बडनेरा रेल्वे स्टेशनवर हजर राहणार होते. सोशल मीडियाद्वारे रेल्वे स्थानकावर उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य आणि युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते आज रात्री आठ वाजता अमरावतीहून मुंबईला निघणार होते. परंतु राणा दाम्पत्य आज पहाटेच मुंबईत दाखल झालं.
नंदगिरी गेस्ट हाऊसमध्ये राणा दाम्पत्याचं बुकिंग
दरम्यान नंदगिरी गेस्ट हाऊसमध्ये रवी राणा आणि नवनीत राणा यांनी आज आणि उद्याचं बुकिंग केलं आहे. परंतु अद्याप राणा दाम्पत्य पोहोचलेलं नसल्याचं गेस्ट हाऊसच्या मॅनेजरने सांगितलं. नंदगिरी गेस्ट हाऊसबाहेर शिवसैनिक हजर असून कोणत्याही परिस्थितीत राणा दाम्पत्याला मातोश्रीपर्यंत पोहोचू देणार नाही किंवा हनुमान चालीसाचं पठण करु देणार नाही, असं शिवसैनिकांनी ठणकावलं.
'वर्षा' आणि 'सिल्वर ओक'चीही सुरक्षा वाढवली
मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं वाचन करण्याचा निर्धार राणा दाम्पत्याने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मातोश्री या त्याच्या खासगी आणि वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ केली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानची सुरक्षाही वाढवली आहे.
ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ ; भाजप नेते आशिष शेलार यांचा इशारा
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला प्राणघातक हल्ला आहे. अशा प्रकारे राज्य चालवणे अपेक्षित नाही. त्यामुळे ठोकशाहीला ठोकशाहीनेच उत्तर देऊ अशा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे.
मुंबई पोलीस राज्य सरकारच्या दबावर काम करत आहे ; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
हल्ला होणार असे ट्विट किरीट सोमय्या यांनी करूनही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. मुंबई पोलीस हे राज्य सरकारच्या दबावर काम करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
भाजप नेते आशिष शेलारांनी घेतली किरीट सोमय्यांची भेट
भाजप नेते आशिष शेलार किरीट सोमय्या यांच्या भेटीसाठी वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर पोहोचले आहेत. शेलार यांनी यावेळी सोमय्या यांची विचारपूस केले.
Kirit Somaiya : शिवसैनिकांच्या हल्ल्यात आपण जखमी झालो असा किरीट सोमय्यांचा आरोप
शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये आपण जखमी झालो असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्याची भेट घेऊन परतत असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या.
Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी बाटल्या, चपला फेकल्या
राणा दाम्पत्याची भेट घ्यायला आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जाताना त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी बाटल्या आणि चपला फेकल्याची घटना घडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
