एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या आमीन चौहान यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
‘हा फक्त माझ्या एकट्याचा गौरव नसून एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनचाही गौरव आहे.’
यवतमाळ : शिक्षक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत आज (मंगळवार) राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यामध्ये देशभरातील निवडक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यवतमाळ येथील प्राथमिक शिक्षक आमीन गुलमहंमद चौहान यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं.
नवनवीन कल्पना वापरुन विद्यार्थ्यांसाठी कायमच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचा सरकारच्या वतीनं सन्मान करण्यात येतो. यवतमाळचे शिक्षक आमीन यांनी देखील कल्पकतेनं विद्यार्थ्यांसाठी कामं केलं. ज्याची पोचपावती आज त्यांना मिळाली.
दरम्यान, पुरस्कारासाठी आमीन चौहान यांनी निवडक उपक्रमाचं सादरीकरण केलं होतं. त्यावेळी त्यांनी एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनचाही दाखला दिला होता. एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनसाठी आमीन यांनी शिक्षकांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुपही तयार केला. त्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शाळेत व्हॉट्सअॅप बुलेटीन वाचनाचा प्रकल्प सुरु केला.
‘पुरस्कार मिळाल्याचा आत्यंतिक आनंद आहे. सेवेच्या अगदी 16व्या आणि वयाच्या 37व्या वर्षी शिक्षकाच्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याने झालेला आनंद शब्दांपलीकडचा आहे. या पुरस्काराने मिळालेली प्रेरणा मला अधिकाधिक कार्य करण्यास सदोदित प्रेरीत करीत राहिल. पुरस्काराने जबाबदारी वाढल्याची जाणीव आहे. यापुढे शिक्षणातील वंचित घटक जसे मुलींचे शिक्षण, गरीब व होतकरू मुलांच्या प्राथमिक व उच्च शिक्षणासाठी कार्य करण्याची इच्छा आहे. हा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनचाही गौरव आहे.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
दिल्लीतील या कार्यक्रमात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे हस्ते आमीन गुलमहंमद चौहान यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग, राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह आणि सचिव अनिल स्वरुप हे देखील उपस्थित होते.
या शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ बहाल (प्राथमिक शिक्षक)
नागोराव तायडे, घाटकोपर (प.) (मुंबई)
उज्ज्वला नांदखिले, साडेसतरा नळी, ता.हवेली (पुणे)
शोभा माने, चिंचणी, ता. तासगांव (सांगली)
तृप्ती हतिसकर, प्रभादेवी (मुंबई)
सुरेश शिंगणे, पो. उंबरखेड, ता. देऊळगांव राजा (बुलडाणा)
संजिव बागुल, सांभवे, पो. माळे ता. मुळशी (पुणे)
राजेशकुमार फाटे, लाखनी (भंडारा),
ज्योती बेलावळे, ता. भिवंडी (ठाणे),
अर्जुन ताकटे, अहेरगांव, ता. निफाड (नाशिक)
रुख्मिणी कोळेकर, करमाळा (सोलापूर)
रामकिशन सुरवसे, औसा (लातूर)
प्रदीप शिंदे, शिलापूर, (नाशिक),
आमीन चौहान, ता. दिग्रस (यवतमाळ)
उर्मीला भोसले, ता.वाशी (उस्मानाबाद)
गोपाल सुर्यवंशी, गंजुरवाडी, ता.जि. (लातूर)
प्राथमिक शिक्षकांच्या विशेष श्रेणी अंतर्गत :
अर्चना दळवी, ता.हवेली (पुणे)
सुरेश धारव, निफाड (नाशिक) यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार
९ माध्यमिक शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नंदा राऊत, ता.आष्टी (बीड
स्मिता करंदीकर, शनिवार पेठ, पुणे
नंदकुमार सागर (मुख्याध्यापक), जेजुरी, ता. पुरंदर,
शर्मिला पाटील, केडगांव, (अहमदनगर),
सुनील पंडीत (मुख्याध्यापक), नवीपेठ, अहमदनगर
कमलाकर राऊत, परळी रोड, अंबाजोगाई (बीड),
संजय नारलवार (मुख्याध्यापक), कानेरी, ता. जि. (गडचिरोली)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement