Nashik News : नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट; हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर अपक्ष उमेदवार किशोर दराडेंची माघार
नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठीच्या हाय व्होल्टेज ड्रामा रंगल्यानंतर आता या निवडणुकीला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर अपक्ष उमेदवार किशोर दराडेंनी आज माघार घेतलीय.
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठीच्या हाय व्होल्टेज ड्रामा रंगल्यानंतर आता या निवडणुकीला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्याशी नाम साधर्म्य असणारे किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) यांचे नामसाधर्म असणारे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे किशोर दराडे यांनी अपक्ष अर्ज भरल्याने 8 जूनच्या दुपारी अडीच वाजेपासून विभागीय आयुक्त कार्यालयात गोंधळ निर्माण झाला होता. अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी माघार घ्यावी यासाठी गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना शिंदेगटाकडून (Shiv Sena Camp) डमी उमेदवार किशोर दराडे यांच्यांवर दबाव टाकला जात होता.
परिणामी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांचे शर्टचे बटन तोडून त्यांना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे आणि समर्थकांकडून मारहाण झाल्याचा आरोपही दुसरे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी केला. हा राडा पोलिसांसमोरच समोरच सुरू असल्याने अखेर किशोर दराडे यांना संरक्षण देण्यासाठी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashikroad Police Station) नेण्यात आले होते.
अखेर आज अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी माघार घेतल्याने आज हा वाद शमला असल्याचे बघायला मिळाले आहे. दोन दिवसांपासून गायब असणारे अपक्ष उमेदवार किशोर दराडे आज थेट विभागीय आयुक्त कार्यलयात माघारीसाठी दाखल झाल्यानं अनेकांना धक्का बसलाय. शिवाय यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित असताना ही माघार घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना, राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने महायुतीत बिघाडी?
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केलाय. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाकडून धुळ्यातील महेंद्र भावसार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीतील दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विविध चर्चांना उधाण आले असून ही जागा शिवसेनेची असून अजित दादांच्या उमेदवाराला आपण माघार घेण्याची विनंती करू, अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी व्यक्त केल्यानंतर विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र निवडणुकीसाठी अजित दादांच्या राष्ट्रवादी गटाकडून आपल्याला एबी फॉर्म देण्यात आल्यानंतर आपण आपली उमेदवारी दाखल केली आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट
माघारीबाबत अद्याप कुठलीही विनंती आपल्याला करण्यात आलेली नाही. याबाबत अजितदादांकडून जो आदेश येईल त्यानुसार पुढची दिशा ठरवू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांनी व्यक्त केली आहे. तसेच लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत फूट पडल्याची देखील चर्चा या निमित्ताने होऊ लागली असून अशी कोणतीही फूट पडलेली नसून पक्षाचे वरिष्ठ नेते एकमेकांशी संवाद साधूनच याबाबत निर्णय घेत असल्याचे महेंद्र भावसार यांनी सांगितले आहे. अशातच आज अपक्ष उमेदवार किशोर दराडे आज थेट विभागीय आयुक्त कार्यलयात माघारीसाठी दाखल झाल्याने नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला वेगळा टिस्ट आल्याचे बघायला मिळाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या