(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Rain Update : राज्यात सर्वदूर पाणीच पाणी, नाशिकला मात्र हुलकावणी, पुढील पाच दिवस कसा असेल पाऊस?
Nashik Rain Update : पावसाळा (Rain) सुरू होऊन सुमारे दीड महिना लोटला तरी नाशिक जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
Nashik Rain Update : पावसाळा (Maharashtra Rain) सुरू होऊन सुमारे दीड महिन्याचा कालावधी लोटला असला तरी नाशिक जिल्ह्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात सर्वदूर पाऊस सुरू (Nashik Rain) असताना अनेक भागात पूर परिस्थिती देखील आहे. मात्र दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात याउलट चित्र पाहायला मिळत आहे. अद्यापही अपेक्षित असा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून शेतकऱ्यांसह नाशिककर आभाळाला आस लावून बसल्याचे चित्र आहे.
राज्यात एकीकडे दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने नाशिकवर (Nashik) वक्रदृष्टी फिरवली आहे. जुलैचा अखेरचा टप्पा सुरू झाला असतानाही जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने खरिपाच्या (Kharip Season) पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. पाऊस लांबल्याने जिल्ह्यात सध्या केवळ 62 टक्के इतक्याच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यांनी पेरणी केली आहे, त्या शेतकऱ्यांनाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मागील तीन दिवसात जिल्ह्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र याही वेळी पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आठ दिवसांपासून कोकण पश्चिम महाराष्ट्र व विदर्भाला पावसाने जोरदार तडाखा दिला आहे सलगच्या पावसामुळे या विभागांमधील नद्या नाले दुथडी भरून वाहत असून तेथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे आजही यवतमाळसह बुलढाणा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून बचाव कार्य सुरू आहे तर दुसरीकडे संततधार सुरु असताना नाशिक जिल्ह्यात अद्यापही अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. नाशिक शहर परिसरात आजही काही हलक्या सरी वगळता पावसाने दडी मारली. त्यामुळे शहरवासीयांसह जिल्ह्यातील नागरिकांची मोठी निराशा झाली असून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत नाशिककर आज लावून बसले आहेत.
पुढील पाच दिवस 'नो अलर्ट'
नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. रोज ढगाळ वातावरण असते, पाऊस पडेल अशी आशादायी चित्र निर्माण होते. मात्र प्रत्येक वेळी पाऊस हुलकावणी देत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दरम्यान पुढील पाच दिवस सुद्धा नाशिक जिल्ह्याला कोणताही अलर्ट नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मुंबईच्या रीजनल मेट्रोलॉजिकल केंद्रातूनही आगामी पाच दिवसांचं पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात नाशिक जिल्ह्याला कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही, त्यामुळे अजूनही नाशिकला पावसाची वाट पहावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.
22/7, पुढच्या 5 दिवसात राज्यात 🌧🌧मुसळधार ते मेघगर्जनेसह 🌩🌩पावसांची शक्यता. pic.twitter.com/vbyxXHXgB5
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 22, 2023
इतर महत्वाच्या बातम्या :