एक्स्प्लोर
Advertisement
नाशिक तळेगाव प्रकरण : 15 दिवसांत आरोपपत्र दाखल करणार : केसरकर
नाशिक: चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 15 दिवसात आरोपपत्र दाखल करु, असं आश्वासन राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे. दीपक केसरकर यांनी नाशिकमध्ये जाऊन पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते.
यानंतर दीपक केसरकर सर्वपक्षीय स्थानिक नेते आणि पोलिस महासंचालकांसोबत संयुक्त बैठक घेणार आहेत.
तर दुसरीकडे परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी, सुरक्षेच्या कारणास्तव आजही नाशिकमधील बहुतेक शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे.
दरम्यान, एका बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याने गेल्या 24 तासांपासून धुमसणारा नाशिक जिल्हा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मध्यरात्रीनंतर आंदोलन थांबवण्यात आलं आहे. सध्या मुंबई-नाशिक वाहतूक खुली करण्यात आली आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या तळेगावमध्ये एका अल्पवयीन मुलाने एका चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. त्यानंतर गावकरी आक्रमक झाले आणि आंदोलनाचं लोण अख्ख्या नाशिक जिल्ह्यात पसरलं.
काल दिवसभर झालेल्या आंदोलनांमध्ये सुमारे 20 गाड्यांचा कोळसा झाला. त्यात एसटी बसेस, पोलिसांच्या गाड्या आणि काही खाजगी वाहनांचाही समावेश होता. दिवसभर सुरु असलेल्या या जाळपोळीच्या सत्राने नाशिक जिल्ह्यातले 6 मार्ग जवळपास ठप्प झाले होते. त्यामुळे हजारो प्रवासी रस्त्यातच अडकून पडले होते.
दरम्यान, पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला असून आंदोलकांना महामार्गांवरून हटवण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
तसंच या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. अशा समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी दिली.
संबंधित बातम्या:
संतप्त जमावाकडून मुंबई-आग्रा हायवेवर रास्तारोको, वाहतूक ठप्प
नाशकात मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, जमावाचा रास्तारोको
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement