एक्स्प्लोर

Graduate Constituency : नाशिक पदवीधरसाठी 28 टेबलवर मतमोजणी, तगडा पोलीस बंदोबस्त, अशी आहे संपूर्ण तयारी

Nashik Graduate Constituency : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी सय्यद पिंप्री येथील गोदामात होणार आहे.

Nashik Graduate Constituency : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी सय्यद पिंप्री येथील गोदामात होणार आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांचे मत मोजणी प्रशिक्षणपूर्ण झाले आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी (Nashik Graduate Constituency) काल शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत अवघे 49.28 टक्के झाले असून 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. विभागातील पाचही जिल्ह्यातून मतपेट्या नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री गावच्या स्ट्रॉंग रूममध्ये पोहचल्यानंतर स्ट्रॉंग रूम सील केली गेली. उद्या सकाळी ही स्ट्रॉंग रूम आता उघडली जाईल. स्ट्रॉंग रूम सील होताच या संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे रूप आले असून सीसीटीव्ही कॅमेराचीही यावर नजर असणार आहे. स्थानिक पोलीस, SRPF चे दोन प्लॅटून्स, होमगार्ड्स आणि बंदूकधारी पोलीस इथे 24 तास तैनात असतील. 

Nashik Graduate Constituency : मतमोजणी प्रकिया कशी असणार...

नाशिक पदवीधर  मतदारसंघासाठी (Nashik Graduate Constituency) नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण  1 लाख 29 हजार 456 मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणी सय्यद पिंप्री येथील गोदामात 28 टेबलवर होणार आहे. एका टेबलावर एक तहसीलदार आणि दोन नायब तहसीलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व मतपेट्यामधील मतपत्रिका एकत्रित करून त्यांचे एक हजाराचे गठ्ठे करण्यात येतील. यानंतर बाद मतपत्रिका बाजूला काढून वैध मतपत्रिकेवरून कोटा ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

Nashik Graduate Constituency : अशी करण्यात आली आहे तयारी

मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्ष, निरीक्षक कक्ष, सुरक्षा कक्ष, माध्यम कक्ष,  केंद्रावरील टेबल रचना, प्रकाश व्यवस्था, विद्युत पुरवठा, आरओ, एआरओ बैठक व्यवस्था, उमेदवारांसाठी बैठक व्यवस्था तसेच आवश्यक त्या कक्षांची उभारणी करण्यात आली आहे. मतमोजणी कक्षात मोबाईल घेऊन जाता येणार नाही. मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवत जबाबदारी देण्यात आलेल्या ठिकाणीच थांबावे तसेच उमेदवारांनी नेमलेल्या मतमोजणी प्रतिनिधी यांनी देखील नियुक्ती दिलेल्या ठिकाणीच थाबावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातमी: 

Graduate Constituency : पदवीधरची मतमोजणी प्रक्रिया नेमकी कशी होते? पसंतीक्रम कसा मोजला जातो? वाचा एका क्लिकवर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  8 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSalil Deshmukh Nagpur Katol : वडिलांवर हल्ला , मुलाचा फडणवीसांवर निशाणाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRaj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Embed widget