एक्स्प्लोर
नाशिकच्या आखाड्यात सर्वात वयस्कर आजीबाई
![नाशिकच्या आखाड्यात सर्वात वयस्कर आजीबाई Nashik 79 Years Old Woman Candidate In Nashik Municipal Election नाशिकच्या आखाड्यात सर्वात वयस्कर आजीबाई](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/16073248/Nashik-old-candidate-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक: नाशिक महापालिका निवडणुकीतील एक उमेदवार राज्यातील सर्वात वयस्कर उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये निवडणुकीच्या रिंगणात चक्क 79 वर्षाच्या आजीबाई उतरल्या आहेत. भिकूबाई बागुल असं त्यांचं नाव आहे. भाजपने प्रभाग 6 मधून त्यांना उमेदवारी दिली आहे.
भिकूबाई कदाचित राज्यातल्या महापालिका निवडणुकीतील सर्वात वयस्कर उमेदवार असण्याची शक्यता आहे.
तरुण उमेदवार आणि राजकीय कार्यकर्त्यांनाही लाजवेल असा भिकूबाईंचा उत्साह आहे. सकाळ - संध्याकाळ अशा दोन सत्रात आजीबाईंचा प्रचार सुरु असतो. आजीच्या प्रचारासाठी नातवंडं, सुनांसह घरातील झाडून सगळे हजर असतात.
भिकूबाई या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्या मातोश्री आहेत. यापूर्वी 1992 आणि 2002 अशा 2 टर्म त्यांनी नाशिक महापालिकेत नगरसेविका म्हणून काम केलं आहे.
इतकंच नाही तर महिला- बालकल्याण सभापती म्हणूनही त्यांनी पद भूषवलं आहे.
गेली 40 वर्ष या परिसरातील प्रत्येक घराशी, व्यक्तींशी भिकूबाईंचा संपर्क आहे. लोकसंग्रह असलेला नेता म्हणून ओळख असलेल्या सुनील बागुलांच्या आई असल्यानं, सर्व प्रभागातही त्यांना आई म्हणूनच हाक मारली जाते.
भावनिक नातं असल्यानं भिकूबाईंच प्रत्येक ठिकाणी आपुलकीनं स्वागत केलं जातं. अनेक ठिकाणी सुहासिनी औक्षणही करतात.
या वयात पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात का उतरल्या, असं विचारलं की भिकूबाई म्हणतात, "आयुष्यच लोकांसाठी अर्पण केलंय. त्यामुळं शेवटपर्यंत लोकसेवाच करायची आहे".
![नाशिकच्या आखाड्यात सर्वात वयस्कर आजीबाई](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/16073248/Nashik-old-candidate-2-300x223.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)