एक्स्प्लोर
शिवसेनेनं सत्ता सोडण्याची हिम्मत दाखवावी: नारायण राणे
सोलापूर: महाभारताच्या नावाखाली महाराष्ट्रात नुसता तमाशा चालू असं म्हणत काँग्रेस नेते नारायण राणेंनी भाजप-शिवसेनेवर निशाणा साधला. महाभारताचं नाव घेण्याची पात्रता दोन्ही पक्षात नसल्याचा घणाघात राणेंनी काल सोलापुरात केला. मध्यावधी निवडणुकांचे संकेत देण्यापेक्षा शिवसेनेनं हिम्मत असेल तर सत्तेतून बाहेर पडावं. असं आव्हानंही राणेंनी दिलं आहे.
‘रामदास कदमांची माझ्यावर टीका करण्याची लायकीच नाही. असं म्हणत राणेंनी यावेळी शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं. काल सोलापूरमध्ये आयोजित प्रचारसभेत नारायण राणेंनी भाजप-शिवसेनेच्या महाभारताचा खरपूस समाचार घेतला.
दोन्ही पक्षांना आपण सत्तेत असल्याची जाणीव नाही. एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले जात आहेत. त्यामुले दोन्ही पक्षांना मतं मागण्याचा नैतिक अधिकारच नाही. असं राणे म्हणाले.
‘भाजप हा गुडांशिवाय, पैशांशिवाय निवडणूक लढवू शकता नाही. भाजप हा गुंडांचा पक्ष झाला आहे.’ असा आरोप राणेंनी केला.
‘आजवर महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचे मुख्यमंत्री कधी झाले नाही. प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची परंपरा, संस्कार आणि संस्कृती जोपासली. पण या मुख्यमंत्र्यांनी ते सारं काही मातीत मिळवलं.’ असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला.
संबंधित बातम्या:
जाणत्या राजाच्या भाकिताचा उलटा अर्थ, शेलारांचं पवारांना प्रत्युत्तर
मध्यावधी निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी सज्ज : शरद पवार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement