एक्स्प्लोर

रेल्वे प्रवासात बाळाला घेऊन जाताना आली अडचण; नंदुरबारच्या पठ्ठ्यानं लावला 'हा' शोध! पेटंटही मिळालं...

रेल्वेमध्ये बाळासोबत प्रवास करताना पत्नीला आलेल्या अडचणीनंतर एका पठ्ठ्यानं रेल्वेत बाळांच्या सोयीसाठी एक संशोधन केलं आहे. या संशोधकाने फोल्डेबल बेबी बर्थचा शोध लावला आहे.

नंदूरबार :  रेल्वेमध्ये बाळासोबत प्रवास करताना पत्नीला आलेल्या अडचणीनंतर एका पठ्ठ्यानं रेल्वेत बाळांच्या सोयीसाठी एक संशोधन केलं आहे. या संशोधकाने फोल्डेबल बेबी बर्थचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे नंदुरबारच्या या शिक्षकाच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. प्राध्यापक नितीन देवरे असं या संशोधकाचं नाव आहे. फोल्डेबल बेबी बर्थ हे संशोधन रेल्वेला विनामुल्य देणार असल्याचं देवरेंनी म्हटलं आहे. 

लहान बाळासह रेल्वे प्रवास करणाऱ्या मातांना प्रवासात निर्धास्त झोप घेता यावी म्हणून नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलचे प्राध्यापक नितीन देवरे आणि त्यांच्या पत्नी हर्षली देवरे यांनी संशोधन केलं आहे. या फोल्डेबल बेबी बर्थला पेटंट मिळाले असून हे संशोधन भारतीय रेल्वेला मोफत देण्याचा निर्णय या दाम्पत्याने घेतला आहे. ही सुविधा रेल्वेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या बर्थ देण्यासाठी कोणताही बदल करण्याची आवश्यकता नसल्याने कमी खर्चात ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

रेल्वे प्रवासात लहान बाळासोबत लांब पाल्याचा प्रवास करताना बाळ आणि आईला झोपण्यासाठी समस्या निर्माण होत असते. त्यात बर्थवरून बाळ खाली पडण्याची भीती असते. ही समस्या लक्षात घेऊन प्राध्यापक नितीन देवरे यांनी फोल्डेबल बेबी बर्थ तयार केला आहे. त्याची रचना अशी आहे कि, हा लोअर बर्थ लावता येणार आहे. त्यामुळे आईला लोअर बर्थ झोपता येणार आहे. बेबी बर्थवर बाळाला झोपवता येणार आहे. त्यात बाळाच्या सुरक्षितेसाठी सेफ्टी बेल्ट लावण्यात आला आहे.

या बेडमुळे कुणाला अडचण होणार नाही. छोट्या बाळासोबत प्रौढ व्यक्तींना आपल्या वस्तू ठेवण्यासाठी उपयोग होऊ शकणार आहे. रेल्वे प्रवास करणाऱ्या आई आणि बाळाचा विचार करून प्रत्येक बोगीत व्यवस्था करावी तसेच हा बेबी बर्थ फोल्ड होत असल्याने बसण्यासाठी कोणतीही अडचण होणार नसल्याचे संशोधक नितीन देवरे सांगतात.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आणि राष्ट्रसेवेची भावना लक्षात घेऊन भारतीय रेल्वेला मोफत हस्तांतरित करण्याचा निर्णय प्रा. नितीन देवरे यांनी घेतला आहे. त्यासंदर्भात रेल्वेसोबत पत्रव्यवहार सुरु केला आहे रेल्वेनेही त्यांचा संशोधनाची दखल घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

रेल्वेने प्रवास करत असताना पत्नीला आलेली अडचण लक्षात घेऊन कमीत कमी खर्चात रेल्वे बर्थमध्ये बदल होऊ शकतात. हा बदल माता आणि बाळाचा आरोग्यासाठी फायदेशीर राहणार असल्याने महत्वाचा ठरेल. नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम भागात राहणाऱ्या संशोधकाचा संशोधनाच सर्वत्र कौतुक होत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ईशान्य मुंबईत मराठी विरूद्ध गुजराती वाद; काय आहे मराठी, गुजराती आणि मुस्लिमांच्या मताचं गणित? 
ईशान्य मुंबईत मराठी विरूद्ध गुजराती वाद; काय आहे मराठी, गुजराती आणि मुस्लिमांच्या मताचं गणित? 
उगीच किंग म्हणत नाही... विराटचा झंझावत, धावांचा पाऊस, असा पराक्रम करणारा पहिलाच
उगीच किंग म्हणत नाही... विराटचा झंझावत, धावांचा पाऊस, असा पराक्रम करणारा पहिलाच
विराट कोहलीचं शतक हुकले, आरसीबीचं पंजाबसमोर 242 धावांचे आव्हान
विराट कोहलीचं शतक हुकले, आरसीबीचं पंजाबसमोर 242 धावांचे आव्हान
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट बातम्या : 09 May 2024Vare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 09 May 2024ABP Majha Headlines : 09 PM : 09 May 2024: Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सShinde vs Thackeray : लोकसभेचा 'गोल'...गद्दारीचे 'बोल'..ठाकरे - शिंदेंचे नेते भिडले! Lok Sabha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ईशान्य मुंबईत मराठी विरूद्ध गुजराती वाद; काय आहे मराठी, गुजराती आणि मुस्लिमांच्या मताचं गणित? 
ईशान्य मुंबईत मराठी विरूद्ध गुजराती वाद; काय आहे मराठी, गुजराती आणि मुस्लिमांच्या मताचं गणित? 
उगीच किंग म्हणत नाही... विराटचा झंझावत, धावांचा पाऊस, असा पराक्रम करणारा पहिलाच
उगीच किंग म्हणत नाही... विराटचा झंझावत, धावांचा पाऊस, असा पराक्रम करणारा पहिलाच
विराट कोहलीचं शतक हुकले, आरसीबीचं पंजाबसमोर 242 धावांचे आव्हान
विराट कोहलीचं शतक हुकले, आरसीबीचं पंजाबसमोर 242 धावांचे आव्हान
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या
Aastad Kale : निवडणुकांच्या धामधुमीत नाट्यगृहात राजकीय पक्षांचे कार्यक्रम, नाटाकाला फटका बसतोय का? आस्ताद काळे म्हणाला,'पुण्यातील दोन प्रयोग रद्द...'
निवडणुकांच्या धामधुमीत नाट्यगृहात राजकीय पक्षांचे कार्यक्रम, नाटाकाला फटका बसतोय का? आस्ताद काळे म्हणाला, 'पुण्यातील दोन प्रयोग रद्द...'
'कलम 370 काढलेलंच नाही', अदानींनी लिथियमसाठी जमिनी खरेदी केल्या, असीम सरोदेंचा हवाला देत ठाकरेंचे खळबळजनक आरोप
'कलम 370 काढलेलंच नाही', अदानींनी लिथियमसाठी जमिनी खरेदी केल्या, असीम सरोदेंचा हवाला देत ठाकरेंचे खळबळजनक आरोप
Malegaon Blast : मी माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून काम केलं; मालेगाव स्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितच्या जबाबातील 20 मोठे मुद्दे
मी माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून काम केलं; मालेगाव स्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितच्या जबाबातील 20 मोठे मुद्दे
Suhas Kande on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांकडून दिंडोरी तुतारीचा जोरदार प्रचार? सुहास कांदेंकडून पुरावे सादर
छगन भुजबळांकडून दिंडोरी तुतारीचा जोरदार प्रचार? सुहास कांदेंकडून पुरावे सादर
Embed widget