एक्स्प्लोर

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, नंदुरबारमध्ये आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

मराठा समाजाला  आरक्षण (Maratha Reservation)  मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील उमर्दे इथं घडली आहे.

Nandurbar Maratha agitation : मराठा समाजाला  आरक्षण (Maratha Reservation)  मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील उमर्दे इथं घडली आहे. गुलाब मराठे असं आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या आंदोलकाचं नाव आहे. गेल्या दीड वर्षापासून मनोज जारांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी लढा देत आहेत. त्यासोबतच नंदुरबार येथील आंदोलक गुलाब मराठे देखील जरांगे यांना समर्थन देत आहेत. 

आत्मदहन करणाऱ्या आंदोलकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात  

मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील आंदोलक आक्रमक झाले आहेत. या आंदोलकांनी शासनाचा निषेध करत आत्मदहन करण्याच्या प्रयत्न केला आहे. आत्मदहन करणाऱ्या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शासनाने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा नंदुरबार जिल्ह्यातील आणखीन तीव्र आंदोलन होणार असल्याचा इशारा आंदोलक गुलाब मराठे यांनी दिला आहे. 

आपली आरक्षणाची लढाई आपल्याला पूर्ण जिंकायचीय : मनोज जरांगे पाटील

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे काही दिवसांपूर्वीच आरक्षणाच्या मागणीसाठी (Resrevation Demand) उपोषणाला बसले होते. गेल्या काही महिन्यांपासून जरांगे हे मराठी समाजाच्या आरक्षणासाठी लढा देताना दिसत आहेत. सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (OBC Reservation) देण्याची त्यांची मागणी आहे. अनेक दिवस त्यांनी उपोषण केले. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असे म्हटले होते. अनेकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका करतानाही जरांगे दिसले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आक्रमक भूमिका जरांगेंनी घेतली. यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोपही केली. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या मागे आपण उभे असल्याचे त्यांनी म्हटले. आता नुकताच जरांगे यांनी मराठा समाजाला मोठे आवाहन केले आहे. मनोज जरांगे पाटील हे धाराशिव जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी लातूरमधील मुरूडमध्ये धावती भेट घेतली. आपली आरक्षणाची लढाई आपल्याला पूर्ण जिंकायची आहे. मी जे काम हातात घेतो ते काम कधीच मी अर्धवट सोडत नाही. कायम एकजूट राहायचं आणि व्यसनापासून दूर राहा. आता ही आरक्षणाची लढाई थोडीशी शिल्लक आहे. त्यामुळे पुढच्या काळात ही मराठा समाजाने एकजूट राहा. राज्यातील संपूर्ण मराठा समाजाला पूर्ण आरक्षण मिळाल्याशिवाय आपण कोणीही मागे हटू नका. आपली लढाई ताकतीने लढायची आहे.

महत्वाच्या बातम्या:

मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मराठा बांधवांना पुढील महिन्याभराचा प्लॅन सांगितला; आता प्रत्येक गावात...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं

व्हिडीओ

Special Report Pune Police : बांगलादेशी तरुणीची पोलिसांकडे धाव, मदतीऐवजी महिला पोलिसाकडून विश्वासघात
Bhandara Crime 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखांना विक्री, डॉक्टरचा प्रताप,5 जणांवर गुन्हा Special Report
Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका
चंद्रपूरमध्ये महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका, जोरगेवार समर्थक 16 नगरसेवकांचा बहिष्कार
RBI : कर्जवसुली एजंटांना प्रशिक्षण अनिवार्य, कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार, सर्व फोन कॉल रेकॉर्ड करणं आवश्यक, RBI नवे नियम लागू करणार
कर्जवसुली एजंटांना कर्जदारांसोबत बोलताना मर्यादा पाळावी लागणार,फोन रेकॉर्ड करावे लागणार, RBI नवे नियम आणणार
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget