एक्स्प्लोर

‘घोटाळ्यात फडणवीसांचा थेट हात नव्हता, पण...’

मुंबई: 18 वर्षापूर्वी नागपूर पालिकेत झालेल्या घोटाळ्याच्या प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणारी  शिवसेना काहिशी तोंडघशी पडली आहे. कारण चौकशी समितीचे तत्कालीन अध्यक्ष नंदलाल यांनी देवेंद्र फडणवीस महापौर असताना त्यांचा घोटाळ्यात थेट हात नव्हता असं म्हटलं आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना नंदलाल यांनी तसा खुलासा केला. देवेंद्र फडणवीस यांचा घोटाळ्यात हात नसला तरीही महापौर म्हणून गैरकारभाराची जबाबदारी त्यांना झटकता येणार नाही. असं नंदलाल यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, कालच्या सभेतही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आरोपाल उत्तर दिलं होतं. ‘विलासराव देशमुख यांनी आम्हाला तेव्हा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. कोणताही पुरावा नसताना आयोगानं अहवाल मांडला. पण हा अहवाल मान्य करता येणार नाही असं हायकोर्टानं स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेनेच्या बोलक्या पोपटाने हायकोर्टाचा अहवाल वाचला असता तर आरोप केले नसते. असं मुख्यमंत्री म्हणाले होतं. काय आहे नेमकं प्रकरण: देवेंद्र फडणवीस महापौर असताना नागपूर महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. शिवसेना आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्यासाठी शिवसेनेने नंदलाल समितीचाही आधार घेतला. 27 फेब्रुवारी 2001चा अहवाल आहे. अनिल पबर म्हणाले की, “मुंबई महापालिकेत भाजपला पारदर्शकता हवी आहे. यासाठी शिवसेनेवर बेच्छूट आरोप केले जात आहेत. याला उत्तर म्हणून नागपूर महापालिकेतील माहिती जनतेसमोर ठेवणार आहोत. नंदलाल समितीने नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचारावर अहवाल सादर केला होता. त्यावेळचे महापौर आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशी अनियमितता केली याचे पुरावे या अहवालात आहेत.”   नंदलाल समितीचा अहवाल – देवेंद्र फडणवीस महापौर असताना स्थायी समितीच्या सदस्यांनी कंत्राटदारासोबत परस्पर वाटाघाटी केल्या – निविदा न मागवताच काही ठराविक कंत्राटदारांना कामं देण्यात आली – या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर नगरसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले – अहवालात महापौरांच्या कारभारावर ठपका ठेवण्यात आला, गुन्हे दाखल करण्याची शिफारसही होती – राजीव घोल्लार, कल्पना पांडे, वसुंधरा मसुरकर आणि देवेंद्र फडणवीस या 4 महापौरांच्या काळात हा भ्रष्टाचार झाला – या काळात 15 महिन्यात नागपुरात एकही सर्वसाधारण सभा झाली नाही मुंबई महापालिकेतील घोटाळ्याच्या चौकशीसाठी SIT नेमली आहे. पण एसआयटीच्या चौकशीत एकाही शिवसेना नेत्याचं नाव आलेलं नाही. जे मुख्यमंत्री आज माझ्याकडे बघून विश्वासाने मत द्या, असं म्हणतात त्यांच्या महापौर असतानाच्या कार्यकाळात नागपूर महापालिकेत मोठे भ्रष्टाचार झाले आहेत, असा आरोप अनिल परब यांनी केला होता. संंबंधित बातम्या: फडणवीस महापौर असताना नागपूर महापालिकेत घोटाळा : शिवसेना ‘साहेब संपत्ती घोषित करणार का?’, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल हिंमत असेल तर ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी करा : शिवसेना भुजबळ आणि उद्धव ठाकरेंचं एकाच कंपनीत मनी लाँडरिंग: सोमय्या मनी लाँडरिंगचे आरोप उद्धव ठाकरेंना बदनाम करण्याचा डाव: शिवसेना कोणत्या पक्षात किती गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार?

महत्त्वाच्या बातम्या

राजू शेट्टींचा तब्बल 8 तास ठिय्या, अधिकाऱ्यांसह 800 पोलिसांचा फौजफाटा रिकाम्या हातानेच परतला, शक्तीपीठला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
राजू शेट्टींचा तब्बल 8 तास ठिय्या, अधिकाऱ्यांसह 800 पोलिसांचा फौजफाटा रिकाम्या हातानेच परतला, शक्तीपीठला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
Koyna Dam Water Dispute : कोयनेच्या पाण्याचा नेमका वाद काय? धरणाचं पाणी मुंबईला देणार? राज्याचं राजकारण तापवणारं संपूर्ण प्रकरण
कोयनेच्या पाण्याचा नेमका वाद काय? धरणाचं पाणी मुंबईला देणार? जाणून घ्या राज्याचं राजकारण तापवणारं संपूर्ण प्रकरण
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
कोयनेचं पाणी मुंबईला देण्यास विरोध नाही, पण आधी साताऱ्याच्या दुष्काळी भागाची तहान भागवा, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य  
कोयनेचं पाणी मुंबईला देण्यास विरोध नाही, पण आधी साताऱ्याच्या दुष्काळी भागाची तहान भागवा, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य  

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
Embed widget