Nana Patole : मोगलाई व्यवस्था विरोधकांना नजरकैदेत ठेवते आहे; नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात
Nana Patole : देशातली मोगलाई व्यवस्था विरोधकांना नजरकैदेत ठेवते आहे. मात्र, मोदाजी जेवढ्या वेळा महाराष्ट्रात येतील, तेवढ्या आमच्या जागा वाढतील, असा विश्वास नाना पटोले यांनी बोलताना व्यक्त केलाय.
Nana Patole on PM Narendra Modi : केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदर (Vadhavan Port) प्रकल्पाचे भूमिपूजन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीच्या नावाखाली गर्दी वाढवण्यासाठी नेले जात असल्याचा आरोप युवा सेनेनं केला आहे. तर दुसरीकडे या प्रकल्पाला काँग्रेससह स्थानिकांनीही विरोध दर्शवला आहे. अशातच यावर काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यावर भाष्य करत निशाणा साधला आहे.
ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे वाढवण बंदर प्रकल्प भूमिपूजनाच्या कार्यक्रमात (Vadhavan Port Inaugurate Program) येत आहे. मात्र त्यांना तिथलेच लोक विरोध करत आहे. राज्यात आणि देशातली मोगलाई व्यवस्था विरोधकांना नजरकैदेत ठेवते आहे. मात्र, मोदाजी जेवढ्या वेळा महाराष्ट्रात येतील, तेवढ्या आमच्या जागा वाढतील, असा विश्वास नाना पटोले (Nana Patole) यांनी बोलताना व्यक्त केलाय.
ही मोगलाई व्यवस्था विरोधकांना हे नजरकैदेत ठेवत आहेत
राज्यभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छोट्या मुर्ती हातात घेऊन आम्ही माफी मागो आंदोलन करणार होतो. मात्र लोकांना नजर कयदेत ठेवले जात आहे. सरकार साधा निषेध देखील नोंदवू देत नाहीये. अनेक नेत्यांची धरपकड सध्या सुरू आहे.या सरकारने तातडीनं पायउतार व्हावं, किंबहुना येत्या एक सप्टेंबरला आम्ही मुंबईत मार्च काढतोय. त्यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित असणार. रविवार आहे त्यामुळे ते कोर्टात जाऊ शकणार नाही. या मोर्च्यासाठी पोलीस परवानगीची वाट आम्हाला बघायची नाही. आम्ही १ तारखेला स्वत:हून अरेस्ट होऊ असेही नाना पटोले म्हणाले. राज्यात सरकारची कमीशनखोरी वाढली आहे. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेतही भ्रष्टाचार केला जातोय. विरोधकांना हे नजरकैदेत ठेवत आहेत. ऐकुणात ही मोगलाई व्यवस्था आहे.
दम असेल तर आता निवडणुका लावाव्या- नाना पटोले
गेल्या काही दिवसांपासून क्राॅस व्होटिंगमुळे संशयाच्या फेऱ्यात सापडलेले काँग्रेसचे (Congress) देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार जितेश अंतापूरकर (Jittesh Antapurkar) यांनी आपल्या पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून जितेश अंतापूरकर आणि काँग्रेसचे काही आमदार हायकमांडच्या रडारवर असल्याची चर्चा होती. आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळणार की नाही याबद्दल साशंक असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
तर यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, अंतरापूरकर आणि सिद्धीकी यांना काँग्रेसमधून आधीच निष्कासित केलंय. त्याबद्दल अधिक बोलायची गरज नसल्याचे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले आहे. तर सध्या महायुतीमध्ये महाभारत चाललंयं. एकीकडे सावंत काही बोलतात. दुसरीकडे भुजबळ काही वेगळं बोलतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महायुतीकडे बघावं आणि दम असेल तर आता निवडणूका लावाव्या असेही नाना पटोले म्हणाले.
हे ही वाचा