Nana Patole : देशानं आज सर्वात संवेदनाहीन प्रधानमंत्री पाहीलाय; लखपती दीदींच्या मेळाव्यावरुन नाना पटोलेंचा घणाघात
एकीकडे महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात अश्रू आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच पैशाने कार्यक्रम घेऊन सरकार पीडितांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत का? असा प्रश्न विचारात नाना पटोलेंनी सरकारवर टीका केलीय.
Nana Patole on PM Narendra Modi : नेपाळ (Nepal Bus Accident) येथील काठमांडू येथे देवदर्शनासाठी जात असताना भाविकांची बस दरीत कोसळली होती. या दुर्दैवी अपघातात जळगावच्या (Jalgaon) 26 भाविकांचा मृत्यू झाला असून नुकतेच या अपघातातील मृतांवर त्यांच्या गावात एकाच वेळी अंत्य संस्कार करण्यात आले आहेत. असे असताना सरकार आणि पंतप्रधानांना थोड्या जरी भावना अथवा थोडी माणुसकी असती तर भाजपने आणि पंतप्रधानांनी हा कार्यक्रम रद्द केला असता. एकीकडे जनतेच्या डोळ्यात अश्रू आहेत तर दुसरीकडे हे लखपती दीदीचा उत्साह साजरा करत आहेत. आजवरच्या इतिहासात सर्वात संवेदनहीन प्रधानमंत्री या देशाने पाहिलाय, अशी बोचरी टीका काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.
सरकार पीडितांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत का?- नाना पटोले
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत आज रविवारी ‘लखपती दीदीं’चा (Lakhpati Didi) मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जळगाव (Jalgaon) विमानतळ परिसरात हा कार्यक्रम होत आहे. यावर बोलताना नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. जळगाव येथे आयोजित कार्यक्रम हा जनतेच्या पैशाने होतोय, हा शासकीय कार्यक्रम आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात अश्रू आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच पैशाने कार्यक्रम घेऊन सरकार पीडितांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत का? असा प्रश्न निर्माण होतोय. असेही नाना पटोले म्हणाले.
महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा- नाना पटोले
सध्या महायुतीमध्ये महाभारत चाललेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हात वर केले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये मोठी गडबड सुरू आहे. पुढच्या महिन्यात महायुतीमध्ये अजून मोठी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोर्टाच्या निकालाची आम्ही वाट पाहतोय. या निकालाकडून आम्हला फार अपेक्षा आहेत. तर आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी हाच चेहरा राहणार आहे. बैठकीतही आम्ही हे जाहीरपणे सांगितलं आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदापेक्षा महाराष्ट्राचा धर्म, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्र वाचवणं, हे महाविकास आघाडीचे कर्तव्य आहे. यासाठी आम्ही सगळे काम करत असल्याचेही नाना पटोले म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या