एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Nagpur News : 'नीरी'त घोटाळ्याचे प्रदुषण? सीबीआयच्या विशेष पथकाकडून झाडाझडती; नेमकं प्रकरण काय?

NEERI Scam : उपराजधानी नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच निरीमध्ये (NEERI) सीबीआयच्या (CBI) पथकाने कारवाई केली आहे.

Nagpur News नागपूर NEERI : उपराजधानी नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (National Environmental Engineering Research Institute) म्हणजेच निरीमध्ये (NEERI) सीबीआयच्या (CBI) पथकाने कारवाई केली आहे. आज, बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास सीबीआयचे एक विशेष पथक निरीमध्ये दाखल झाले आणि यावेळी येथील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

बनावट कंपनीच्या माध्यमातून सरकारच्या निधीचा अपहार झाल्याच्या अनुषंगाने काही तक्रार सीबीआयकडे पोहोचली होती. तसेच खाजगी कंपन्यांना अनुकूल अहवाल दिले जात असल्याची तक्रार ही सीबीआयकडे पोहोचली होती. त्याच प्रकरणी माहिती घेण्यासाठी सीबीआयचे पथक पोहोचल्याची माहिती आहे. यावेळी सीबीआयच्या पथकाकडून संबंधित विभागाची झाडाझडती घेत पाहणी करण्यात आलीय. 

नागपूरसह देशातील वेगवेगळ्या चार राज्यात एकूण 17 ठिकाणांवर छापे

सीबीआयने आज राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था मध्ये केलेल्या कारवाईच्या प्रकरणात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये एकूण दहा जणांना आरोपी बनवले आहे. यातील आरोपींमध्ये नीरीचे तत्कालीन संचालक राकेश कुमार यांच्यासह चार शास्त्रज्ञ आणि पाच खाजगी कंपन्यांचा समावेश आहे. या सर्वांवर निरीच्या वेगवेगळ्या साहित्य खरेदी प्रक्रियेतील टेंडर प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप असून त्या संदर्भात सीबीआयला काही तक्रारी मिळाल्या होत्या. त्या आधारावर आज सीबीआयने नागपूर (महाराष्ट्र) सह देशातील वेगवेगळ्या चार राज्यात एकूण 17 ठिकाणांवर छापे टाकले आहे.

'नीरी'त घोटाळ्याचे "प्रदुषण"?

नीरी केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद म्हणजेच CSIR अंतर्गत काम करणारी नामांकित संशोधन संस्था आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणाऱ्या या नामांकित संशोधन संस्थेत सीबीआयचे पथक चौकशीसाठी आल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नीरीत ठराविक आणि ओळखीच्या व्यक्तींकडूनच महागड्या संशोधन उपकरणांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आल्याची प्रथमिक माहिती आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) मिळालेल्या तक्रारीवरुन संशयास्पद शास्त्रज्ञ कार्यालयाची झडतीसह कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. मात्र अचानक करण्यात आलेल्या या  कारवाईने नीरी केंद्रात एकच खळबळ उडाली आहे. परिणामी, आता या प्रकरणी पुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या  

Nagpur Accident : हातात मोबाइल, कानात हेडफोन; क्षणात होत्याचं नव्हतं झालं; रेल्वे रुळ ओलांडने 15 वर्षीय युवकाच्या जीवावर बेतलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Embed widget