एक्स्प्लोर

Nagpur News: शासनाचा मोठा निर्णय! देशातील 199 जिल्हा कृषी हवामान केंद्े होणार बंद; राज्यातील 11 केंद्रांचाही समावेश

Nagpur News: भारतीय हवामान खात्याकडून जिल्हास्तरावरील हवामानाचा अंदाज कळविण्यात येत होता. मात्र निधी उपलब्धतेची अडचण असल्याचे सांगत अवघ्या पाच वर्षांतच हा शेतकरी हिताचा उपक्रम गुंडाळण्यात येत आहे.

Nagpur News: जागतिक स्तरावर होणाऱ्या वातावरणातील बदलांचा सर्वाधिक परिणाम हा शेतीवर होत असतो. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि  भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) यांच्या समन्वयाने जिल्हास्तरावर हवामान सल्ला मिळत असेतो. त्या आधारे पीक व्यवस्थापन करता यावे आणि  त्यातून पीक नुकसान कमी व्हावे, या उद्देशातून देशभरात 199 तर महाराष्ट्रात 11 केंद्रे उघडण्यात आली होती. या जिल्हा कृषी हवामान केंद्राद्वारे आठवड्यातून मंगळवारी आणि  शुक्रवारी असे दोन दिवस हवामानाचा अचुक अंदाज, हवामान आधारित कृषी सल्ला शेतकरी बंधूंना प्राप्त होत असे. मात्र निधी उपलब्धतेची अडचण असल्याचे सांगत अवघ्या पाच वर्षांतच हा शेतकरी हिताचा उपक्रम गुंडाळण्यात आल्याने केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. 

1 मार्च पासून होईल सेवा बंद 

देशात 2018-19 या वर्षात जिल्हा कृषी हवामान केंद्र, भारतीय हवामान विभाग आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या समन्वयाने देशात एकूण 199 तर महाराष्ट्रात 11 केंद्रे उघडण्यात आली होती. या आधारे शेतकरी त्यांच्या शेतातील पिकांचे आणि इतर घटकांचे योग्यप्रकारे आणि सुक्ष्मपणे नियोजन करीत होते. याव्यतिरिक्त हवामानात होणारे अचानक बदल जसे की, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट, उष्णतेची लाट, शीत लहर, पावसाचा खंड इत्यादि विषयी जिल्हा कृषी हवामान केंद्र त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावध करीत असे. त्यामुळे शेतकरी सजग होऊन आपल्या  पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यास सक्षम होत असे.

अशा या हवामान आधारित कृषी सल्ला सेवेमुळे देशातील शेतकरी वर्गाला मोठा फायदा झाल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु पृथ्वी विज्ञान मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या भारतीय हवामान खात्याच्या  परीपत्राकानुसार देशातील शेतकरी हितार्थ काम करणारी ही 199 जिल्हा कृषी हवामान केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना 1 मार्च 2024 पासून हवामान आधारित कृषी सल्ला सेवा प्राप्त होणार नाही.

यात शेतकरी बंधुंचे फार मोठे नुकसान होणार असल्याची भावना उमटतांना दिसत आहे. सरकारचा हा निर्णय देशातील असंख्य शेतकऱ्यांसाठी, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेती क्षेत्रासाठी चिंताजनक असून शेवटी याचे नकारात्मक रूपांतर राष्ट्रीय आर्थिक विकास दरात होणार असल्याची भिती आहे. याचा पुनर्विचार करून शेतीला राष्ट्राच्या विकासाचा केंद्रबिंदू मानून सरकारने ही जिल्हा कृषी हवामान केंद्र पुर्ववत सुरू ठेवावी ही मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. 

महाराष्ट्रातील 11 केंद्रांचा समावेश

महाराष्ट्रात पालघर, तुळजापूर (धाराशिव), छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नंदूरबार, सीआयसीआर (नागपूर), दुर्गापूर (अमरावती), गडचिरोली, साकोली (भंडारा), करडा (वाशीम), बुलडाणा अशा 11 ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात आली होती. मंगळवार आणि शुक्रवार असा दोन • दिवस हवामान आधारित सल्ला दिला जात. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

International Lottery Day : लॉटरीचा ट्रेंड पुन्हा वाढतोय! आतापर्यंत 13 राज्यांची मंजुरी; एका झटक्यात कोट्यधीश करणाऱ्या लॉटरीचा इतिहास काय? 
लॉटरीचा ट्रेंड पुन्हा वाढतोय! आतापर्यंत 13 राज्यांची मंजुरी; एका झटक्यात कोट्यधीश करणाऱ्या लॉटरीचा इतिहास काय? 
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
Devendra Fadnavis In Kolhapur : तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP MajhaMumbai Rain : मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP MajhaZero Hour on BJP Marathwada Mission | विदर्भ, मराठवाडा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती? ABP MajhaZero Hour on Opposition Reaction : अमित शाहांच्या दौऱ्याला अर्थ नाही, मराठवाड्यात मविआची ताकद!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
International Lottery Day : लॉटरीचा ट्रेंड पुन्हा वाढतोय! आतापर्यंत 13 राज्यांची मंजुरी; एका झटक्यात कोट्यधीश करणाऱ्या लॉटरीचा इतिहास काय? 
लॉटरीचा ट्रेंड पुन्हा वाढतोय! आतापर्यंत 13 राज्यांची मंजुरी; एका झटक्यात कोट्यधीश करणाऱ्या लॉटरीचा इतिहास काय? 
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
Devendra Fadnavis In Kolhapur : तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
MLA Prakash Awade Joins BJP : आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
Sharad pawar: मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट
मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट
Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सासरवाडीतील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सासरवाडीतील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
झेनिथ धबधब्याजवळ वाहून गेली 22 वर्षीय तरुणी; कृष्णा व्हॅलीतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
झेनिथ धबधब्याजवळ वाहून गेली 22 वर्षीय तरुणी; कृष्णा व्हॅलीतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Embed widget