एक्स्प्लोर
वक्त्यांच्या लांबलेल्या भाषणांमुळे प्रेक्षकांनीच जेवणाचे स्टॉल सुरु केले
प्रमुख वक्ते अजित पवार आणि मुकुल वासनिक यांच्या भाषणाआधीच प्रेक्षकांचा संयम सुटला आणि त्यांनी जेवणाच्या स्टॉल्सवर ताबा मिळवला
नागपूर : वक्त्यांच्या लांबलेल्या भाषणामुळे कंटाळलेल्या आणि भूक लागलेल्या प्रेक्षकांनी जेवणाच्या दिशेने अक्षरशः धाव घेतली. नागपुरातील काटोलमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात हा प्रकार घडला. प्रमुख वक्ते अजित पवार आणि मुकुल वासनिक यांच्या भाषणाआधीच प्रेक्षकांचा संयम सुटला.
नेत्यांची भाषणे होऊ द्या, असं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते प्रेक्षकांना सांगत होते. मात्र तीन वाजेपर्यंत जेवण सुरु न केल्यामुळे वैतागलेल्या प्रेक्षकांनी अक्षरशः जेवणाची ताटं आणि जिन्नस हिसकावून घेत जेवायला सुरुवात केली.
आयोजक कार्यकर्त्यांनीही प्रेक्षकांच्या भूकेपुढे नमतं घेतलं आणि बाजूला होणं पसंत केलं. त्यामुळे जेवणाचे पेंडॉल पूर्णपणे आपल्या ताब्यात घेत प्रेक्षकांनी जेवणावर ताव मारला.
काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि मंत्री अनिल देशमुख या दोघांनी प्रत्येकी एक-एक तास भाषण ठोकल्यामुळे कार्यक्रम लांबला आणि प्रेक्षक कंटाळले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement