एक्स्प्लोर

Gunaratna Sadavarte Attack: मोठी बातमी: जालन्यात गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला

Gunaratna Sadavarte Attack: मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मराठा आंदोलकांचा हल्ला, पोलिसांना कळण्यापूर्वीच डाव साधला.

Gunaratna Sadavarte Attack: मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे आणि मनोज जरांगे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मराठा आंदोलकांनी (Maratha Agitators) हल्ला केल्याचा प्रकार घडला. गुणरत्न सदावर्ते हे रविवारी जालना येथील धनगर उपोषण(Dhangar Agitation) आंदोलनाला भेट जाण्यासाठी जात होते. त्यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यावरुन जात असताना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी मराठा आंदोलक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. याठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. आंदोलकांना पाहून पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. यानंतर आंदोलक गाडीवर धावून जातील, असे पोलिसांना वाटले नव्हते. मात्र, एके ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांना चुकवून गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांची गाडी गाठण्यात यश मिळवले. या आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर धावून जात काचेवर फटके मारले. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येतात त्यांनी मराठा आंदोलकांना तातडीने पकडले. मात्र, तोपर्यंत दोन-तीन मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या लिमोझिन गाडीच्या काचेवर फटके मारले होते. यानंतर पोलिसांनी सर्व मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये काही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) समर्थक विश्वंभर तिरुखे यांचाही समावेश असल्याचेही समजते. त्यामुळे आता पोलीस या आंदोलकांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या हल्ल्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच मराठा आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. अशात आता गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर धावून जाणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करुन कारवाई केल्यास मनोज जरांगे पाटील आक्रमक होऊ शकतात. मराठा आरक्षण आंदोलन ऐन भरात असताना राज्यातील अनेक नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध तोंडातून शब्द काढायची हिंमत करत नव्हते. त्यावेळी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी अत्यंत आक्रमक भाषेत मनोज जरांगे पाटील यांचा समाचार घेतला होता. त्यांनी मुंबईतील मराठा आंदोलनालाही विरोध केला होता. मनोज जरांगे पाटील यांची मागणी संवैधानिक नसल्याचे सांगत गुणरत्न सदावर्ते यांनी सातत्याने मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध केला होता. 

यापूर्वी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले असताना काही मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईतील घराबाहेर असणाऱ्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. त्यानंतर मराठा आंदोलकांकडून गुणरत्न सदावर्ते यांना अनेकदा इशारेही देण्यात आले होते. मात्र, गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करणे सुरुच ठेवले होते.

आणखी वाचा

मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी गळ्यातील उपरणी काढून पाटलांना झाकलं, सहीसलामत बाहेर काढलं

अंतरवालीत लाठीचार्जचा आदेश कुणी दिला सगळ्यांनाच माहिती, त्याचं समर्थन करू नका; रोहित पवारांचे भुजबळांना उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
कालच रुग्णालयातून डिस्चार्ज, आज पुन्हा मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचार सुरु, नेमका त्रास काय? 
कालच रुग्णालयातून डिस्चार्ज, आज पुन्हा मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचार सुरु, नेमका त्रास काय? 
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget