एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नागपुरातील आर्किटेक्टच्या हत्येची पाळंमुळं 1982 सालामध्ये!
नागपूर : नागपुरातील आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या हत्येला 1982 मधला जमिनीचा वादग्रस्त व्यवहार कारणभूत असल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी सकाळी निमगडेंची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
हत्याकांडामागे नागपूर-वर्धा रोडवर असलेली 5.5 एकर जागा कारणीभूत असल्याचा कयास पोलिसांनी बांधला आहे. 9 लाखांचा हा व्यवहार पूर्णत्वास गेलाच नाही. निमगडे आणि सिद्दीकी कुटुंबियांमध्ये न्यायालयीन लढाईसुद्धा सुरुच आहे.
दरम्यान या जमिनीवरुन शहरातले बिल्डर्स आणि राजकारणी धमकावत असल्याचा आरोपही एकनाथ निमगडे यांच्या मुलानं केला आहे. तर पोलिसांनी या हत्याकांडात कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा समावेश असल्याचा पुरावा नसल्याचं म्हटलं आहे.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर सहा गोळ्या झाडल्या!
6 सप्टेंबरला मॉर्निंग वॉकवरुन परतत असताना 72 वर्षीय निमगडे यांच्यावर अज्ञातांनी 6 गोळ्या झाडल्या. त्यानंतर उपचारादरम्यान निमगडेंचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच घडलेल्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली होती.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement