एक्स्प्लोर
Advertisement
नागपूर संघाची नाही तर बाबासाहेबांची भूमी : कन्हैया
नागपूर : नागपूर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमी नसून ही बाबासाहेबांची भूमी असल्याचं वक्तव्य, दिल्लीतील जवाहरलाला नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूतील छात्र संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमारने नागपुरात केलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमीत्त कन्हैया कुमारनं नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाऊन दर्शन घेतलं. त्यावेळी कन्हैयानं एबीपी माझाशी संवाद साधला.
"भारत हा लोकशाही देश आहे, हा देश मनुस्मृतीनुसार चालणार नाही. संघ नागपूरला बदनाम करत आहे. मात्र नागपूरची भूमी ही संघाची नसून, ही बुद्धांची, बाबासाहेबांची दीक्षा भूमी आहे" असं कन्हैया म्हणाला.
दरम्यान, कन्हैयाच्या नागपूर दौऱ्याला बजरंग दलानं विरोध दर्शवत त्याच्या गाडीवर दगडफेक केली. याप्रकरणी 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दीक्षाभूमीवर जाताना लाल सलामचे नारेही लावण्यात आले.
चप्पल चोरीला
दरम्यान, कन्हैया कुमार दीक्षाभूमीवर गेल्यानंतर त्याची चप्पल चोरीला गेली. त्यामुळे चप्पलशिवाय कन्हैया पुढच्या कार्यक्रमांसाठी निघाला. कन्हैयासाठी दुसरी चप्पल मागवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
नागपुरात कन्हैया कुमारच्या गाडीवर दगडफेक
मनसे नेत्याकडून कन्हैयाला जेवणाचं आमंत्रण!
कन्हैया धाकट्या भावासारखा, पुण्यात सभा घेणार : कुमार सप्तर्षी
कन्हैया कुमारवर चप्पल भिरकावली
कन्हैयासह पाच विद्यार्थ्यांना जेएनयूमधून निलंबीत करण्याची शिफारस
जेएनयू कॅम्पसमध्ये कन्हैया कुमारवर हल्ला
अकाऊंटमध्ये 150 रुपये आणि कन्हैयाला मारण्यासाठी 11 लाखांचं इनाम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement