एक्स्प्लोर
दिवाळीचे कपडे खरेदी करु न दिल्याने तरुणीची आत्महत्या
दिवाळीच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या खरेदीवरुन कुटुंबीयांशी वाद झाल्याने 20 वर्षीय पल्लवीने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
नागपूर : दिवाळीचे कपडे खरेदी करु न दिल्याच्या रागातून 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. नागपुरातील पल्लवी करडभाजने या तरुणीने गळफास घेतला.
नागपुरातल्या वसंत नगर भागात पायल कुटुंबासोबत राहत होती. महाविद्यालयीन शिक्षण घेणारी पल्लवी ही घरातील सर्वात मोठी मुलगी असून तिच्यापाठीमागे एक बहीण आणि लहान भाऊ आहे, तर वडील शेतकरी आहेत.
पल्लवीने मंगळवारी दुपारच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दिवाळीच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या खरेदीवरुन तिचा कुटुंबीयांशी वाद झाला होता. याच कारणास्तव तिने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
आत्महत्येपूर्वी पल्लवीने कुठलीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement