एक्स्प्लोर
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या पत्नीला भोंदूमातेचा गंडा
नागपूर : भोळ्याभाबड्या भाविकांना भोंदू बाबांनी चुना लावणे हे तसं नेहमीचं झालं आहे. मात्र एखाद्या राजकारण्यांच्या पत्नीला चुना लावणं आणि तोही नेत्याच्या घरात घुसून, यासाठी कॉन्फिडन्स पाहिजे. माजी मंत्री आणि नागपूरमधील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या पत्नीला भोंदू मातेने 51 हजारांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे.
रामदासपेठेतील वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर एक पुरुष आणि एक महिला आली. सोनमाता असल्याचं महिलेने सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे अनेकांनी सोनमातेला आपला गुरु मानलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी सोनमातासाठी 51 हजार रुपये देण्याचे कबुल केल्याचं भोंदूमातेने वडेट्टीवार यांच्या पत्नीला सांगितलं.
विजय वडेट्टीवार घरी नसल्याने त्यांच्या पत्नीने कॉल लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो लागला नाही. साहेबांचे खूप चांगले दिवस येणार आहेत. त्यांना अजून मोठं पद मिळणार आहे, असं सांगून महिलेनं वडेट्टीवारांच्या पत्नीला भूल घातली. यानंतर वडेट्टीवारांच्या पत्नी महिलेला 51 हजार रुपये दिले.
ही भोंदू जोडी एवढ्यावरच थांबली नाही तर मुलांच्या नावाने काहीतरी दिलं तर त्यांचंही आयुष्य उत्तम होईल, असं त्यांनी वडेट्टीवारांच्या पत्नीला सांगितलं. यानंतर विजय वडेट्टीवारांच्या मुलीनेही स्वतःच्या आणि भावाच्या नावे आणखी दहा हजार रुपये दिले
हा सर्व प्रकार बंगल्याच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. विजय वडेट्टीवार यांना यासंदर्भात कळल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली. मात्र तोवर चोरट्यांच्या जोडीने पोबारा केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement