एक्स्प्लोर
मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेवर दरोडा, 30 किलो सोन्याची लूट
![मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेवर दरोडा, 30 किलो सोन्याची लूट Nagpur 30 Kg Gold Looted At Manappuram Gold Loan मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेवर दरोडा, 30 किलो सोन्याची लूट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/28181334/Nagpur-Manappuram-Gold-Loan-Loot.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : नागपुरात मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेवर दरोडा पडला आहे. या दरोड्यात तब्बल 30 किलो सोनं आणि तीन लाख रुपयांची रोकड लुटल्याची माहिती आहे.
नागपुरातील जरीपटका पोलिस स्टेशन अंतर्गत भीमचौकावरील कुकरेजा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेत ही मोठी लूट झाली. सहा लुटारुंनी शस्त्राच्या धाकावर 30 किलो सोनं आणि तीन लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याची माहिती मणप्पुरमतर्फे पोलिसांना देण्यात आली आहे.
दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दरोड्याची घटना घडली. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)