एक्स्प्लोर

Maharashtra Mutton Price Hike | बर्ड फ्लूच्या भितीने मटणाचे दर भिडले गगनाला, सामान्यांच्या खिशाला कात्री

राज्यात बर्ड फ्लू (Bird Flu) च्या वाढत्या प्रभावामुळे चिकनच्या मागणीत घट झाली असून मटणाच्या (Matton rate) मागणीत वाढ झाली आहे. परिणामी मटणाचे दर अव्वाच्या सव्वा वाढत असून त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागल्याचं चित्र आहे.

मुंबई: राज्यात बर्ड फ्लू च्या वाढत्या प्रभावाचा परिणाम थेट मटणाच्या महागाईवर झाला असून अनेक ठिकाणी विक्रेत्यांनी मटणाच्या भावात वाढ केली आहे. त्यामुळे झणझणीत मटणाचा रस्सा खाणाऱ्या खवय्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यामुळे त्याचा परिणाम आता मटणाच्या दारावर झाल्याचे चित्र दिसतंय. बर्ड फ्लू अगोदर अनेकलस ठिकाणी 450 ते 500 रुपये प्रतिकिलो विकले जाणारे मटण आता 650 रुपयांच्या जवळपास विकले जात असल्याचं दिसतंय. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्याचवेळी चिकनच्या दरात घट होऊन त्याची विक्री प्रतिकिलो 100 रुपयांपर्यंत करण्यात येत आहे. पण त्याला म्हणावी तशी मागणी नाही.

हे पुण्य नव्हे पाप करताय! रंकाळ्यातील मृत बदकांच्या तपासणीतून धक्कादायक माहिती समोर

नांदेड शहरात मटणाचा दर जवळपास साडे सहाशे पर्यंत पोहचला आहे. बर्ड फ्लू मुळे मटण दुकानामध्ये खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र आहे. बर्डफ्लू संसर्गाचा परिणाम चिकन विक्री वर झाला असून परिणामी चिकनच्या दरात मोठी घट झाली आहे. मटणाची मागणी वाढल्यामुळे मटणाचे दर तेजीत आलेत. त्यामुळे बकऱ्यांची विक्री किंमतीत वाढ झाली असल्याची माहिती दुकानदारानी दिली आहे.

मंगळवेढ्यात मटणाचे दर गगनाला, कोंबडीकडे ग्राहकांची पाठ मंगळवेढा तालुक्यात जंगलगी येथे बर्ड फ्लू सापडला. त्यानंतर मारापुर व भालेवाडी या भागातही कोंबड्या मरु लागल्याने प्रशासनाने या परिसरात कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर निर्बंध आणले. परिणामी जिल्ह्यात सर्वत्र चिकनकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता बोकडाच्या मटणाचे दर गगनाला भिडू लागले आहेत . पंढरपूर परिसरात बोकडाचे मटण आता 700 ते 750 रुपये किलोने विक्री केले जात आहे.

कोंबड्यांनंतर शेळ्यांवरही अज्ञात आजाराचं सावट, लातूरमधील शेतकऱ्याच्या नऊ शेळ्या दगावल्या

मटणासाठी बोकड मिळणे कमी झाल्याने हे दर अजून वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. सध्या बोकडाच्या मटणाची मागणी वाढत असली तरी बोकडाची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम मटणाच्या किंमतीवर झाला आहे. मटण साधारण 700 ते 750 या दराने विकले जात आहे. मटणासाठी बोकड मिळत नसल्याने अनेक मास विक्रीची दुकाने दिवसेदिवस बंद राहत आहेत.

या आधी 300 रुपये किलोने जाणारी गावरान देशी कोंबडी आता 160 रुपयालाही विकली जात नाही . हीच अवस्था बॉयलर कोंबडीची झाली असून आता बॉयलर कोंबड्या 130 ते 150 रुपयाच्या आसपास विकल्या जात आहेत. बर्ड फ्लूचा परिणाम अंडी विक्रीवरही झाला असून 8 रुपयाला विकली जाणारी देशी अंडी आता 3 रुपयालाही कोणी खरेदी करीत नाहीत. बर्ड फ्लू च्या भीतीमुळे ग्रामीण भागातील कोंबड्या मातीमोल भावाने खरेदी केल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबांचे अर्थचक्रच बिघडले आहे.

रत्नागिरीतही मटणाचे दर वाढले रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला दिसून येत नाही. असं असलं तरी जिल्हा किंवा रत्नागिरी शहराचा विचार करता चिकनच्या मागणीत तसेच हॉटेलमधून मागविल्या जाणाऱ्या पदार्थांच्या मागणीत 50 टक्के घट झाली आहे. सध्या ग्राहकांनी पाठ फिरवल्यानं चिकनचे दर 40 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्याचवेळी मटण आणि मटणपासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये मात्र मात्र वाढ होतेय. शिवाय, माशांची मागणी देखील सध्या वाढली आहे. पुढील काही दिवसांत रत्नागिरीतील मटणाचे दर हे 700 रूपये किलोच्या पुढे जातील असा अंदाज सध्या मटण विक्रेते व्यक्त करत आहेत. जिल्ह्यात बर्ड फ्लू नसताना देखील सोशल मीडियाच्या फॉरवर्डेड मेसेजमुळे अफवा पसरत असल्याचे सांगत हॉटेल व्यवसायिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यू! मुख्यमंत्री म्हणाले, 'अफवा अन् चुकीची माहिती पसरु नये'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget