एक्स्प्लोर

'ते' सहा मृतदेह उकरणार्‍या कर्मचार्‍याचा हार्ट अटॅकने मृत्यू

सातारा : वाईतील कसाई डॉ. संतोष पोळने केलेल्या सहा हत्यांमुळे अवघ्या राज्यभरात खळबळ उडाली आहे. पोळने पुरलेले सहा मृतदेह उकरणाऱ्या पालिकेतील सफाई कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या प्रकरणाचा धसका घेतल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.   वाई हत्याकांडातील सहा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी वाई पालिकेतील कर्मचार्‍यांची मदत घेतली होती. त्यांच्यापैकी 49 वर्षीय सुभाष विठ्ठलराव चक्के यांचा सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता हृदयविकाराने मृत्यू झाला. सुभाष चक्के यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.चक्के यांनी या प्रकरणाचा धसका घेतल्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.     चक्के हे पालिकेत सफाई कामगार म्हणून गेली 24 वर्षे काम करीत होते. त्यांच्या पश्‍चात मुलगा, पत्नी आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे. डॉ. संतोष पोळने केलेल्या सहा हत्यांतील मृतदेह पोलिसांनी वाई नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांकडून उकरुन बाहेर काढले. मृतदेहांचे फक्त सांगाडेच शिल्लक राहिल्यामुळे त्या ठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांना त्रास झाला. सुभाष चक्के यांनाही हा तणाव सहन न झाल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं आहे. त्यामुळेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं नातेवाईकांनी सांगितलं.     कसं झालं हत्यांचं प्लॅनिंग ? संतोष पोळ अतिशय थंड डोक्यानं हत्येचं प्लॅनिंग करायचा. दोन दोन महिने महिलांच्या मागावर असायचा. संतोषचा कबुलीजबाब ऐकून अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहात नाही. हत्येच्या दोन महिने आधीच तो मोठे खड्डे खणायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.   13 वर्ष.. सहा हत्या.. डॉ. पोळच्या कृष्णकृत्याने साताऱ्यात थरकाप   13 वर्षात संतोषशी संबंध आलेल्या 5 महिला बेपत्ता झाल्या. पोलिसात तशा तक्रारी आल्या. पण तपास लाल फितीत अडकल्यानं संतोष पोळ मोकाट होता. पोलिसांच्या दाव्यानुसार हत्यांमध्ये फक्त आणि फक्त आर्थिक देवाणघेवाणीचाच संबंध आहे. त्यामुळे 5 हत्यांशिवाय संतोषनं आणखी काही लोकांचाही गळा घोटलाय का? याचाही तपास सुरु आहे.     स्वत:ला डॉक्टर म्हणवणाऱ्या संतोषचा कारभार सुरुवातीला एका पडक्या घरातून चालायचा. माती आणि पत्र्याचं घर. धोमचा परिसर थोडा आडवळणाचा, त्यामुळं कुणी आजारी पडलं तर आजूबाजूच्या गावांमधील लोकांना संतोष पोळचाच आधार होता आणि त्याचाच फायदा संतोष घ्यायचा.   महिलांना एड्सची भीती दाखवून शोषण   महिलांना गुप्तरोग आणि एड्स झाल्याची भीती दाखवून त्यांचं आर्थिक शोषण सुरु करायचा. अर्थातच भीतीचं भांडवलं. डॉक्टरकीच्या नावाखालीच संतोष पोळची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही उठबस होती. त्यामुळे गावातलं कुणीही संतोषविरोधात बोलायचं धाडस करत नव्हतं. अगदी संतोषच्या वागण्याबोलण्यात संशय जाणवल्यावर सुद्धाही.   मंगल जेधे खून प्रकरणः आतापर्यंत 6 खून केल्याची आरोपीची कबुली   थंड डोक्याचा आणि क्रूर मानसिकतेच्या संतोषचं धाडस इतकं की त्यानं अगदी घराच्या बाजूलाच एक मृतदेह पुरला होता. संतोषच्या डॉक्टरकीच्या डिग्र्या किती खऱ्या आहेत, याचाही शोध पोलिसांनी सुरु केला आहे. पण महिलांना मृत्यूचा घाट दाखवण्यासाठी त्यानं भूल देण्यासाठी वापरलं जाणारं औषधच हत्यार म्हणून वापरलं. दिल्ली निठारी हत्याकांडानं गोठून गेली होती, आता साताराही हादरला आहे. त्यामुळे सावध राहा आणि बेसावधपणे कुणावरही विश्वास ठेऊ नका.

संबंधित बातम्या

डॉ. संतोष पोळचा आणखी एक धक्कादायक खुलासा

मंगल जेधे खून प्रकरणः आतापर्यंत 6 खून केल्याची आरोपीची कबुली 

13 वर्ष.. सहा हत्या.. डॉ. पोळच्या कृष्णकृत्याने साताऱ्यात थरकाप

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget