एक्स्प्लोर
घराणेशाही जिंदाबाद : पत्नी, मुलगा, भाऊ... कुणा-कुणाला तिकीट देऊ?
मुंबई : राज्यभरात सध्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचं वातावरण आहे. सगळीकडे उमेदवारी, बंडखोरी, तिकीट वाटप इत्यादी चर्चा सुरु आहे. नातलगांना तिकिटं दिल्याने अनेकजण बंडखोरी करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, आपल्याच नातेवाईकाला तिकीट मिळवून देण्यासाठी आटापीटा करत आहेत. भाजप असो किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना, किंवा अगदी डावेही घराणेशाहीत आता मागे राहिले नाहीत. पाहूया आतापर्यंत कुणाच्या घरात तिकीट मिळालं आहे.
नाशिक : भाजप नेते दिनकर पाटील यांचा मुलगा अमोल प्रभाग-8 मधून महापालिकेच्या रिंगणात
नाशिक : माजी महापौर अशोक दिवे यांची दोन्ही मुलांना महापालिकेची उमेदवारी
नाशिक : शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्याही दोन्ही मुली तनुजा आणि नयना अनुक्रमे प्रभाग 21-अ आणि 22-अमधून रिंगणात
अहमदनगर : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील यांची राहाता मतदारसंघात गटासाठी उमेदवारी
अहमदनगर : कोपरगाव तालुक्यात राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेव्हणे राजेश परजणे यांची गटासाठी उमेदवारी
अहमदनगर : राज्य साखर संघाचे अध्यक्ष आणि माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांची सून अनुराधा नागवडे यांची श्रीगोंदा गटासाठी उमेदवारी
अहमदनगर : नगर तालुक्यात माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे पुत्र प्रताप पाटील शेळके यांना देहरे गटातून उमेदवारी
अहमदनगर : माजी आमदार नंदकुमार झावरे यांचा मुलगा राहुल झावरे यांना पारनेर गणासाठी उमेदवारी
अहमदनगर : श्रीगोंद्यात भाजप नेते बबनराव पाचपुते यांचे बंधू सदाशिवराव पाचपुते यांना काष्टी गटात उमेदवारी
अहमदनगर : भाजपाचे पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांचे दीर राहुल राजळे यांना उमेदवारी
अहमदनगर : राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांच्या पत्नीला पाथर्डी गटासाठी उमेदवारी
अहमदनगर : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या पत्नीला शेवगाव गटातून उमेदवारी
अहमदनगर : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या पुतण्याला शेवगाव गणातून उमेदवारी
अमहदनगर : नेवासा मतदारसंघाचे माजी आमदार वकीलराव लंघे यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या मुलीसाठी उमेदवारी
अमहदनगर : राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांची सून आणि आमदार संग्राम जगताप यांच्या वहिनीला श्रीगोंदा गटासाठी उमेदवारी
अमहदनगर : माजी आमदार वसंतराव झावरे यांचे पुत्र सुजीत झावरे आणि आई जिल्हा परिषदेच्या रिंगणात
अमहदनगर : माजी आमदार शंकरराव गडाख यांचे चुलत भाऊ सुनील गडाख यांना जिल्हा परिषदेत, तर पत्नी सुनीता यांची गणासाठी उमेदवारी
सोलापूर : सोलापूर महापालिकेतून माकपचे माजी आमदार नरसय्या आडाम यांनी पत्नी कामिनी आडाम आणि कन्या अरुणा आडाम यांना उमेदवारी दिली आहे.
जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुलगी आशा पांडे-दानवे यांना जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं आहे.
लातूर : काँग्रेस नेते अमित देशमुखांनी भाऊ धीरज देशमुख यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली.
उस्मानाबाद : आमदार राणा जगजितसिंहनी पत्नी अर्चना पाटलांना तिकीट दिलं.
उस्मानाबाद : आमदार बसवराज पाटलांचा मुलगा शरण यांना उमेदवारी मिळाली आहे.
उस्मानाबाद : खासदार रवी गायकवाडांनी मुलगा किरणला उमेदवारी दिली आहे.
नांदेड : भाजप नेते भास्करराव खतगावकरांनी सुनेला उमेदवारी दिली आहे.
बीड : बीडच्या क्षीरसागर कुटुंबियातुन रेखाताई रवींद्र क्षीरसागर आणि संदीप रवींद्र क्षीरसागर उमेदवारी मिळाली आहे.
परभणी : माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी आपले चिरंजीव समशेर वरपूडकर यांना उमेदवारी मिळाली आहे.
परभणी : शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्या काँग्रेसमध्ये असलेले तुकाराम रेंगे यांनी आपला मुलगा बाळासाहेब रेंगे यांना उमेदवारी दिली आहे.
परभणी : माजी मंत्री रावसाहेब जामकर यांचे नातू आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर यांचा मुलगा संग्राम जामकर यांना उमेदवारी मिळाली आहे.
पुणे : भाजप खासदार अनिल शिरोळे यांचा मुलगा सिद्धार्थ शिरोळे यांना प्रभाग क्र. 14 मधून उमेदवारी
सोलापूर : भाजपकडून पालकमंत्री विजय देशमुख यांचे चिरंजीव डॉ. किरण देशमुख यांना उमेदवारी जाहीर
मुंबई : मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेचे विभागप्रमुख सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांना प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 मधून उमेदवारी
मुंबई :आकाश पुरोहित यांना मुंबई महापालिकेसाठी वॉर्ड क्रमांक 221 मधून उमेदवारी. आकाश हे भाजपचे आमदार राज पुरोहित यांचे सुपुत्र आहेत.
मुंबई :मुंबई महापालिकेसाठी नील सोमय्या यांना मुलुंडच्या 108 वॉर्डातून उमेदवारी. नील हे भाजप खासदार किरीट सोमय्या यांचे सुपुत्र आहेत.
मुंबई : गोरेगावातून 50 क्रमांकाच्या वॉर्डातून दीपक ठाकून यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. दीपक ठाकूर हे महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचे सुपुत्र आहेत.
मुंबई :मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 148 मधून भाजप नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांच्या पत्नी रुक्मिणी यांना भाजपने उमेदवारी मिळाली आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेसाठी खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना अणुशक्ती नगर वॉर्ड- 144 मधून शिवसेनेनं तिकीट दिलं आहे.
पुणे : महापौर प्रशांत जगताप यांच्यासह त्यांच्या मातोश्री माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप यांना उमेदवारी
पुणे : माजी आमदार पठारे यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका संजिला पठारे, पुतन्या नगरसेवक महेंद्र पठारे यांनी उमेदवारी
पुणे : माजी नगरसेवक सूर्यकांत आंदेकर यांचे चिरंजीव वनराज आंदेकरांना उमेदवारी
पुणे : नगरसेविका हिना मोमिन यांचे बंधू भारत कांबळे यांना उमेदवारी
पुणे : नगरसेविका प्रिया गदादे यांच्या समवेत बंधू प्रेमराज गदादेंना उमेदवारी
पुणे : शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य बाबा धुमाळ यांच्या पत्नी दिपाली धुमाळ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ
रायगड : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुलगी आदिती तटकरे यांना वरसे गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement