मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघातांचं सत्र सुरुच, आज दिवसभरात 7 ते 8 गाड्यांचा भीषण अपघात
मुंबई-पुणे एक्सप्रेसवर (Mumbai Pune Express) आज सात ते आठ गाड्यांचा अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. खालापूर टोल नाका आणि लोणावळा घाटाच्या मधील भागात हा अपघात झाला आहे.

Mumbai Pune Express Accident News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर (Mumbai Pune Express) आज सात ते आठ गाड्यांचा अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. खालापूर टोल नाका आणि लोणावळा घाटाच्या मधील भागात हा अपघात झाला आहे. या अपघातात बस बरोबरच कारचा देखील समावेश आहे. या अपघातात कार मधील प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणातीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस अपघात (Accident) होण्याचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याची विविध कारणे आहेत. अशातच मुंबई पुणे एक्सप्रेसवर देखील दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या मार्गावर अपघातात अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात होण्याची विविध कारणं
सातत्यानं पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात होत आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात होण्याची विविध कारणं आहेत. या महामार्गावर अनियंत्रित उतार आहे. टोकदार वळणे देखील आहे. तसेच यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. यावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. अपघातांची संख्या व नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुणे-मुंबईचा प्रवास हा अनेकांना नकोसा झाला आहे. जड वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक, रस्त्याच्या कडेला होणारे वाहनांचे अवैध पार्किंग तसेच वाटेत बंद पडणारी वाहने, घाटात वाहने चालविणारे अकुशल चालक, निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे अशी अपघाताची विविध कारणे आहेत.
महाराष्ट्रात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे
महाराष्ट्रात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2024 मध्ये एकाच वर्षात अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या 15 हजारांहून अधिक आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात रोज 42 अपघाती मृत्यू होत असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील अपघात 19 टक्क्यांनी वाढले आहेत, तर समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या 4 टक्क्यांनी घटली आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आली आहे. नऊ जिल्हे आणि शहरांमध्ये मृत्यूंमध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात अपघाती मृत्यूंमध्ये सर्वाधिक 25 टक्के वाढ झाल्याची माहिती एका अहवालात देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Kalyan Accident : दादा, माझ्या आईला उठवा ओ! रक्ताने माखलेल्या अवस्थेत मुलाची आर्त हाक, कल्याणच्या अपघातातील काळीज सुन्न करणारा प्रसंग
























