विद्यमान नगरसेवक असलेल्या ठिकाणी संबंधित पक्षच लढणार, काहीच जागांची अदलाबदल होणार, महायुतीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
राज्यात महापालिकेच्या निवडणुकांची (Municipal Corporation Election 2026) घोषणा झाली आहे. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी भाजपा आणि शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे.
Mumbai : राज्यात महापालिकेच्या निवडणुकांची (Municipal Corporation Election 2026) घोषणा झाली आहे. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी भाजपा आणि शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे. दरम्यान, याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीची मुंबईत बैठक पार पडली. महायुतीच्या बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकत्र लढण्यास सहमती देण्यात आली आहे. ज्या जागेवर विद्यमान नगरसेवक, ती जागा संबंधित पक्षालाच देण्यात यावी यावर बैठकीत सर्वांचं एकमत झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. काही जागांची अदलाबदल होणार असल्याची माहिती मिळत आहे.
महायुतीच्या जागावाटपाबाबत गुरुवारी पुन्हा एकदा मॅरेथॉन बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. मॅरेथॉन बैठकीत वॉर्डनिहाय दोन्ही पक्षांकडून चर्चा पार पडणार आहे. संपूर्ण दिवसभर बैठकीचा सिलसिला सुरु राहणार आहे. अडचणी आल्यास जागावाटपातील तिढा भाजपा आणि शिवसेना पक्षश्रेष्ठी चर्चेतून सोडवणार असल्याची माहिती आहे. जागावाटपाच्या प्रक्रियेतून महायुतीची प्रतिमा मलिन होऊ नये आणि कोणताही वाद बाहेर जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक (Municipal Corporations Election Schedule)
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
अर्जाची छाननी - 31 डिसेंबर
उमेदवारी माघारीची मुदत - 2 जानेवारी
चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी - 3 जानेवारी
मतदान - 15 जानेवारी
निकाल - 16 जानेवारी
राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणुकांची घोषणा
राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणुकांची (Election) घोषणा करण्यात आली असून देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेसाठी सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत शिवेसना-भाजपा-राष्ट्रवादी महायुती म्हणून एकत्र लढणार आहे. तर, मुंबई (Mumbai) महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. पुढील आठवडाभरात उमेदवारांच्या नावांची यादी निश्चित करायची असल्याने वेगवान हालचाली सुरू आहेत. त्यातच, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची, विविध मेळाव्यांची जबाबदारी आदित्य ठाकरे घेणार आहेत. निवडणुकीत युवा मतदारांना ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळवण्यासाठी, त्यांचे प्रश्न त्यांचे विविध मुद्दे प्रचारात मांडण्याचं कामही आदित्य यांच्या रणनीतीत असणार आहे. आगामी राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीत (Municipal Corporation Election 2026) राज्यात बहुतांश ठिकाणी भाजपा आणि शिवसेना एकत्र लढणार आहे. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल जाहीर केलं.
महत्वाच्या बातम्या:
Ajit Pawar On Devendra Fadnavis Municipal Election 2026: पुण्यात भाजपाने राष्ट्रवादीविरुद्ध शड्डू ठोकला, आता अजित पवारही मैदानात उतरले, म्हणाले.....
























