उत्तराखंडमध्ये फिरायला गेलेल्या मुंबईतील दांपत्याचा बर्फात अडकून मृत्यू
उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या मुंबईतील दांपात्याचा बर्फात अडकून मृत्यू झाला आहे.
मुंबई : संपूर्ण उत्तर भारतात थंडीच्या लाटेची तीव्रता वाढली आहे. उत्तराखंड येथे बर्फाळ भागात फिरायला गेलेल्या एक दांपत्याचा प्रचंड थंडी आणि बर्फात अडकून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा शोध देखील तब्बल पंधरा दिवसांनी स्थानिक पोलिसांना लागला आहे.
मुंबईचे रहिवासी असलेले संजीव गुप्ता आणि आणि त्यांची पत्नी सिंशा गुप्ता हे 13 डिसेंबरला उत्तरखंड येथील जोशीमठ परिसरात असलेल्या गौरसो टॉप परिसरात फिरायला गेले होते. मात्र तेथे प्रचंड बर्फ वृष्टी झाली होती. कदाचित या मुळे हे दांपत्य या बर्फात अडकून पडले आणि त्यातच कडाक्याच्या थंडीने त्यांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. संजीव हे अनेक वर्षे एका वृत्तवाहिनीमध्ये कॅमेरामन म्हणून कार्यरत होते ते प्रभादेवी येथील भारत मिल म्हाडा वसाहतमध्ये भाड्याने रहात होते.
ही घटना घडल्यानंतर स्थानिक पोलिस आणि प्रशासनाला त्यांच्या कुटुंब मित्र परिवार यांचा शोध लागत नव्हता. अखेर गुप्ता ज्या असोसिएशनचे सदस्य होते त्या असोसिएशन मधून त्यांचा संपर्क झाला आणी आता अखेर सतरा ते अठरा दिवसांनी त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे. मात्र ही घटना दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचे टीव्हीजे असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांचे म्हणणे आहे.
भारतातील बर्फाळ प्रदेशांमध्येही तापमान अतिशय कमी झाले आहे. तापमान कमी झाल्यामुळे बर्फाळ प्रदेशांमध्ये हिमवर्षाव सुरु होण्यास सुरुवात झाली आहे. हिमाचल प्रदेशच्या अनेक भागात हिमवर्षाव झाला आहे. बर्फवृष्टीमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-