Mumbai-Goa cruise : कॉर्डिलिया क्रूझवरील 66 प्रवाशांना कोरोनाची लागण
Mumbai-Goa cruise : कॉर्डिलिया क्रूझवरील दोन हजार प्रवाशांपैकी 66 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबई : मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवरील 66 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. क्रूझवर दोन हजारापेक्षा अधिक प्रवासी अडकून पडले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. सध्या जहाज मोरमुगाओ पोर्ट क्रुझ टर्मीनलजवळ आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने क्रूझला गोव्यात उभी करण्याची परवानगी नाकारल्याने क्रूझ मोरमुगाओ पोर्टजवळ उभी करण्यात आली आहे.
कॉर्डिलिया क्रूजवरील दोन हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. गोवा सरकारनं कॉर्डिलिया क्रूझला परवानगी नाकारली होती. या संदर्भात कलेक्टर आणि एमपीटी (मोरमुगाओ पोर्ट ट्रस्ट) कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ट्वीट करत दिली आहे.
Covid-19 Update - Goa
— VishwajitRane (@visrane) January 3, 2022
Out of 2000 samples tested from Cordelia crusie ship, 66 passengers tested positive for #COVID19
Respective collectors & MPT staff have been informed of the same.
The authorities will decide whether to allow disembarking of passengers from the ship.
कॉर्डेलिया क्रूझवर दोन हाजाराहून अधिक प्रवासी करोनाच्या संसर्गामुळे रविवारी रात्रीपासून हे प्रवासी क्रूझवर अडकले आहेत. कूझवरील क्रू मधील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने गोवा सरकारने क्रूझवरील प्रवाशांना चाचणीशिवाय उतरण्यास नकार दिला होता. कॉर्डेलिया हे क्रूझ जहाज मुंबईहून गोव्याला आले आहे.
राज्यात दैनंदिन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालायने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 11 हजार 877 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 97.21 टक्के इतका झाला आहे. राज्यात आज 11 हजार 877 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर? एकाच आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत 181 टक्क्यांनी वाढ
- Mumbai School : मुंबईत पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा 31जानेवारीपर्यंत बंद
- Mumbai Omicron cases: मुंबईतील कोरोनाबाधितांपैकी 80 टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित, BMC आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha