मुंबई महापालिकेसह कल्याण डोंबिवलीची प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध, हरकती नोंदवण्यासाठी 4 सप्टेंबरपर्यंतचा वेळ
मुंबई महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. मुंबई महापालिकेच्या बाबतीत निवडावयाच्या सदस्यांची संख्या 227 व प्रभागांची संख्या 227 इतकी निश्चित केली आहे.
Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. मुंबई महापालिकेच्या बाबतीत निवडावयाच्या सदस्यांची संख्या 227 व प्रभागांची संख्या 227 इतकी निश्चित केली आहे. प्रत्येक प्रभागात साधारणपणे लोकसंख्या 45 ते 65 हजारांच्या दरम्यान आहे. हरकती व सूचना महापालिका आयुक्त यांचे निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय या ठिकाणी नोंदविता येणार आहेत. यासाठी 27 कार्यालय मुंबईत असणार आहेत. मुंबईत 27 ठिकाणी प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी 4 सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेत मोठा बदल नाही. 2017 सालच्या निवडणुकीत 227 प्रभाग होते यामध्ये अगदी काही प्रमाणात प्रभागांमध्ये थोडेफार बदल करण्यात आली असल्याची माहिती आहे. प्रत्येक प्रारुप प्रभागाची रचना करताना त्या त्या ठिकाणची लोकसंख्या आणि झालेली विकास काम यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेतील प्रभाग रचनामध्ये थोडाफार बदल करण्यात आला असल्याची माहिती आहे. प्रत्येक प्रभागामध्ये साधारणपणे 45 हजार ते 65 हजार या दरम्यान लोकसंख्या ठेवण्यात आली आहे.
4 सप्टेंबर 2025पर्यंत संबंधित कार्यालयात हरकती व सूचना सादर करता येईल
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबत हरकती व सूचना सादर करण्यासाठी संबंधित कार्यालयांची यादी सोबत देण्यात आली आहे. दिनांक 4 सप्टेंबर 2025पर्यंत संबंधित कार्यालयात हरकती व सूचना सादर करता येईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर
कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग रचना जाहीर देखील निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका एकूण 122 जागा आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका 2025 निवडणूक या वर्षी बहुसदस्यीय प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.
3 सदस्यीय प्रभाग 21 आणि 25
4 सदस्यीय प्रभाग 29
एकूण प्रभाग 31
कल्याण डोंबिवली महापालिका लोकसंख्या -1518762
अनुसूचित जाती संख्या 150171
अनुसूचित जमाती 42584
राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आता झालेल्या बैठकीत आजच दहा महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हरकती सूचना आणि त्यावरील सुनावणी या सगळ्याला विलंब होऊ नये यासाठी वेळेतच प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या:
























