स्टील उद्योग राज्याबाहेर जाण्याच्या मार्गावर? वीज दरात सवलत आणि सोयी सुविधा नसल्यामुळे उयोजक संतप्त
राज्यातील स्टील उद्योजक सध्या संतत्प झाले असून अनेक सोयी सुविधी मिळत नसल्यामुळे हे उद्योजक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई : राज्यात येणारे मोठे प्रकल्प (Project) दुसऱ्या राज्यात गेल्यानं विरोधी पक्ष राज्य सरकावर अजूनही टीका करत असल्याचं चित्र आहे. राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी विरोधक गेल्या दोन वर्षांपासून सरकारला धारेवर धरत आहेत. त्यात आता सध्या राज्यात असणारे स्टील उद्योग (Steel Industry) देखील संकटात असल्याचं पाहायला मिळतयं. राज्यात सरकारकडून (Government) सहकार्य आणि सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे दुसऱ्या राज्यात व्यवसाय करण्यासाठी जाण्याचा विचार सध्या उद्याजोक करत असल्याचं म्हटलं जात आहे. महाराष्ट्र हे राज्य भारतात गेल्या अनेक वर्षात उद्योग क्षेत्रामध्ये अग्रेसर असल्याचं महाराष्ट्राच्या औद्योगिक अभ्यास करताना आपण वाचल आहे.
महाराष्ट्रात पोलादी उद्योग हा एक फार मोठा उद्योग आहे. साधारण वर्षभर महाराष्ट्रातून हजारो कोटी रुपयांची उलाढाल या उद्योगातून होते. तसेच दीड ते दोन लाख इतक्या प्रमाणात रोजगार राज्यातील लोकांना मिळतो. मात्र हा उद्योग करणारे उद्योजक अनेक समस्येला सामोरे जात असल्याचं चित्र आहे. पोलाद उद्योगांना राज्यातील वीजदर परवडत नसल्याची खंत पोलाद उद्योजकांच्या बैठकीत उद्योजकांनी नुकतीच व्यक्त केली. वारंवार वीज दरात सवलत आणि इतर सोयी सुविधा देण्यासंदर्भात विदर्भ इंडस्ट्रियल असोसिएशन, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीस असोसिएशन आणि स्टील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या मॅन्युफॅक्चरर संघटनांनी सरकारकडे मागणी करूनही सरकार दखल घेत नसल्यामुळे ही नाराजी व्यक्त केली जात आहे.ॉ
काय आहेत समस्या?
सध्या वीज दर अधिक आहेत. म्हणजेच सध्या 20 पैशाने fac चार्जेस अधिक आहेत. व्यवसायासाठी सोयी सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच प्रोडक्शन कोस्ट देखील महाराष्ट्रात उत्पादन घेताना अधिक लागत असल्याचं उद्योजकांचं म्हणणं आहे. दरम्यान या सगळ्या समस्यांना सध्या उद्योजकांना महाराष्ट्रात तोंड द्यावं लागत असल्यांचं म्हटलं जात आहे.
इतर उद्योग राज्याबाहेर हलवण्याचा इशारा
एकीकडे राज्यातून मोठे प्रकल्प परराज्यात गेल्यानं विरोधी पक्षाने राज्य सरकारवर टीका केली होती. त्यातच आता महाराष्ट्रात वीज दरात सवलत न दिल्यास राज्यातील आणि इतर सोयी सुविधा न दिल्यास स्टील उद्योग राज्याबाहेर हलविण्याचा इशारा स्टील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रकडून सरकारला देण्यात आलाय. देशातील काही राज्यांमध्ये विशेषतः गुजरात , छत्तीसगडमध्ये पोलाद उद्योगांना सरकारकडून अनेक सवलती आणि सुविधा दिल्या जातात . या राज्यातील वीजेचं दर मध्यम ठेवण्यात आले आहेत. मराठवाडा , विदर्भातील पोलाद उद्योगाला अडीच ते साडेतीन रुपये प्रति युनिट अधिक दराने वीज खरेदी करावी लागत आहे. तसेच उद्योग करण्यासाठी सोयी सुविधा देखील नाहीत त्यामुळे हे उद्योजक संतप्त झालेत.
स्टील उद्योजकांचे म्हणणं आहे की, सरकार दरबारी वारंवार मागणी करूनही लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे परराज्यात आपला हा उद्योग घेऊन जावा का या विचारात सध्या उद्योजक पडले आहेत. जर खरंच सोयी सुविधा आणि सवलत मिळाल्या नाही तर हे उद्योजक राज्य बाहेर गेल्यास ही गोष्ट राज्याला परवडण्यासारखी नाही.