एक्स्प्लोर

Rain Live Update | पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; नदी, नाले भरून वाहायला सुरुवात

मुंबईमध्ये पावसाचा हायअलर्ट (High alert in Mumbai) देण्यात आलेला आहे. मुंबईसह (Mumbai Rain Update) काही ठिकाणी ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईसह राज्यातील सर्व ठिकाणच्या पावसाचे प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये..

Mumbai Maharashtra Rain Live Update Rain Live Update | पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; नदी, नाले भरून वाहायला सुरुवात

Background

मुंबई : भारतीय हवामान विभागामार्फत काल 4 जुलैपासून मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. सकाळी 11 वाजून 37  मिनिटांनी 4.5 मीटर पेक्षा जास्त उंचीची भरती समुद्रात असणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आपल्या अखत्यारीतील सर्व 24 विभाग कार्यालयासह सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क, सुसज्ज आणि कार्यतत्पर राहण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने आपत्कालीन परिस्थिती विषयक परिस्थितीचा अंदाज घेत सर्वच यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगितले आहे.

महापालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभाग कार्यालयांना सतर्क, सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने सर्व विभाग नियंत्रण कक्षांना ‘हाय अलर्ट’ देण्यात आले असून मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सुसज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

पर्जन्य जलवाहिन्या विभागाची 6 उदंचन केंद्रे सुसज्ज असून 299 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेले पाण्याचा उपसा करणारे संच कार्यान्वित रहातील, याचीही खातरजमा करण्यात आली आहे. या अनुषंगाने आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.बृहन्मुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह 6 प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवावीत, असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रासाठी असलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या 3 तुकड्यांना आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईत पावसाचा हायअलर्ट, हायटाईडमुळे समुद्रात 15 फुटांपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता

भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिकाऱ्यांना त्वरीत मदतीकरिता तत्पर रहाण्यास सांगण्यात आले आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विद्युत पुरवठा करणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमासह इतर विद्युत वितरण कंपन्यांना त्यांच्या पथकांसह सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संभाव्य अतिवृष्टी आणि त्याच वेळी असणारी मोठी भरती याबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून सर्व भ्रमणध्वनी कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना सतर्क करणारे संदेश SMS पाठविण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.

मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व पर्यायी बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ कार्यरत ठेवण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले असून त्यानुसार नियोजनात्मक अंमलबजावणी करण्यात आली आहे.

15:08 PM (IST)  •  05 Jul 2020

पालघर जिल्ह्यात कालपासून पावसाने जोर पकडला असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे काही नाले भरून वाहायला सुरुवात झाली आहे. विक्रमगड मधील तांबडी नदीच्या प्रवाहात वाढ झाल्याने गडदे-विक्रमगड मार्गावरील तांबडी पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी तयार केलेला रस्ता पुरात वाहून गेला .त्यामुळे येथे एक ट्रक अडकून पडला असून तो काढण्याचे काम सुरू आहे.
18:51 PM (IST)  •  05 Jul 2020

हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Nashik News: पिवळ्या पाण्याने वाढवली धास्ती! नाशिकच्या 'त्या' बोअरवेलमधील पाण्यात 1 हजार पट विषारी क्रोमियम, अहवालात धक्कादायक प्रकार समोर
पिवळ्या पाण्याने वाढवली धास्ती! नाशिकच्या 'त्या' बोअरवेलमधील पाण्यात 1 हजार पट विषारी क्रोमियम, अहवालात धक्कादायक प्रकार समोर
Buldhana Crime News : कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं, जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याला संपवलं; बुलढाणा हादरलं!
कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं, जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याला संपवलं; बुलढाणा हादरलं!

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget