एक्स्प्लोर

Ashadhi Wari : पंढरपूर यात्रेदरम्यान घाटाच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या? हायकोर्टाचा प्रशासनाला सवाल

Ashadhi Wari 2024 : रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत चिंता व्यक्त करत पालखी सोहळ्याच्या दरम्यान गर्दीमुळे होऊ शकणारे अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. 

मुंबई: महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरात सध्या लाखो भाविक आषाढी एकादशीच्या (Pandharpur Ashadhi Wari 2024) पार्श्वभूमीवर दाखल होऊ लागलेत. मात्र येथील घाटाची दुर्दशा झाल्यानं इथं अपघात होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. याची दखल घेत घाटात कोणताही अपघात होणार नाही यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत त्याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं (Mumbai High Court) राज्य सरकारला निर्देश दिलेत.

काय आहे याचिका?

पंढरपुरातील चंद्रभागा नदी काठावरील घाटाच्या सुशोभीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून जलसंपदा विभागाकडून सुरू आहे. मात्र ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या मुसळधार पावसात कुंभार घाटावरील निर्माणाधीन भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला होता. घाट सुशोभीकरणाच्या कामात वापरण्यात साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलं होतं. 

या दुर्घटनेतील दोषींविरोधात कायदेशीर कारवाई करावी तसेच ठेकेदारांच्या कंपनीचा काळ्या यादीत समावेश करावा अशी मागणी करत अ‍ॅड. अजिंक्य संगीतराव यांनी अ‍ॅड. राकेश भाटकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यावर गुरूवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. 

याचिकाकर्त्यांच्या वतीनं यावेळी हायकोर्टात सांगण्यात आलं की, पंढरपुरातील विप्रा दत्त घाट आणि उद्धव घाटाची सध्या पुरती वाताहत झाली असून त्या ठिकाणी केवळ साधी बॅरिकेड लावण्यात आली आहेत. त्यामुळे पालखी सोहळ्यादरम्यान गर्दीमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. 

यावर मुख्य सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी माहिती देताना कोर्टाला सांगितलं की, संबंधित ठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले असून प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापनचा आराखडाही तयार केलेला आहे. गेल्या दोन वर्षात इथं कोणताही अपघात झालेला नाही. यावर्षी सुद्धा अनुचित प्रकार घडणार नाही याची दखल घेत यावर राज्य सरकारला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत हायकोर्टानं सुनावणी 16 जुलैपर्यंत तहकूब केली.

17 जुलै रोजी आषाढी

यावर्षी आषाढी एकादशी 17 जुलै रोजी होत असून यात्रेत यंदा प्रथमच अगदी भंडीशेगावपासून पंढरपूर शहरापर्यंत ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यंदाची आषाढी एकादशी आजपर्यंतच्या आषाढीतील बेस्ट असेल असा विश्वास सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Delhi CM Arvind Kejriwal : तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
Nagpur Hit & Run case: नागपूर हिट अँड रन प्रकरणात लेकरु अडचणीत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी अमित शाहांनाही काहीच बोललो नाही
मी मुलासाठी पोलिसांवर दबाव आणला नाही, अमित शाहांनाही काहीच बोललो नाही: चंद्रशेखर बावनकुळे
Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashish Desmukh On BJP :  धनंजय मुंडे, वळसे पाटील यांच्यावर आशिष देशमुखांचा गंभीर आरोप #abpमाझाArvind Kejriwal Bail : अरविंद केजरीवाल पुन्हा मैदानात! कोर्टाकडून जामीन मंजूरLadki Bahin Yojana Scam : लाडकी बहिणींच्या पैशांवर डोळा, पुरुषांच्या फॉर्मवर महिलांचे फोटोNagpur Audi car Accident : अर्जुन हावरे आणि चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
'धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील मविआच्या माजी मंत्र्यांना साथ'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप, महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Delhi CM Arvind Kejriwal : तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
तब्बल 177 दिवसांनी बाप्पा पावले; दिल्ली सीएम केजरीवाल जामिनावर बाहेर आले, आता पुढे काय?
Nagpur Hit & Run case: नागपूर हिट अँड रन प्रकरणात लेकरु अडचणीत, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी अमित शाहांनाही काहीच बोललो नाही
मी मुलासाठी पोलिसांवर दबाव आणला नाही, अमित शाहांनाही काहीच बोललो नाही: चंद्रशेखर बावनकुळे
Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 
Laser Lights Banned in Kolhapur : दोन डोळे जायबंदी होताच कायद्याचे डोळे उघडले; कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!
दोन डोळे जायबंदी होताच कायद्याचे डोळे उघडले; कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!
एकीकडे राज ठाकरेंची भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका, दुसरीकडे पंढरपुरातील मनसेचे उमेदवार मुस्लीम मतदारांना घेऊन निघाले अजमेर शरीफला
एकीकडे राज ठाकरेंची भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका, दुसरीकडे पंढरपुरातील मनसेचे उमेदवार मुस्लीम मतदारांना घेऊन निघाले अजमेर शरीफला
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
मुंबईत शिंदेंच्या आमदाराकडून मुस्लीम महिलांना बुरखा वाटप, महायुतीत वादाची ठिणगी, भाजप आक्रमक
Bigg Boss Marathi Aarya Jadhao : जेल की घराबाहेर गच्छंती? निक्कीला मारहाण केल्याने आर्याला बिग बॉस कोणती शिक्षा देणार?
जेल की घराबाहेर गच्छंती? निक्कीला मारहाण केल्याने आर्याला बिग बॉस कोणती शिक्षा देणार?
Embed widget