एक्स्प्लोर

Ganeshotsav 2024 : मुंबईतील गणेशभक्तांना दिलासा! आता रात्रभर घेता येणार गणपतींचे दर्शन, 'बेस्ट'ने घेतला महत्वपूर्ण निर्णय

Ganeshotsav 2024 : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळांच्या गणपतींचे दर्शन गणेशभक्तांना घेता यावे, यासाठी 'बेस्ट' (BEST) उपक्रमाने यंदाही रात्रभर सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Ganeshotsav 2024 : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळांच्या गणपतींचे दर्शन गणेशभक्तांना घेता यावे, यासाठी 'बेस्ट' (BEST) उपक्रमाने यंदाही रात्रभर सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. नऊ मार्गांवर 24 अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार असल्याची माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिलीय. या बस 7 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरपर्यंत चालवण्यात येणार आहेत. तर गेल्या वर्षीही बेस्ट उपक्रमाने शेवटच्या पाच दिवसांत रात्रभर बस सेवा दिली होती. दरम्यान, यंदाही राज्य सरकारच्या सूचनेनुसार दहा दिवस बस सेवा देण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईतील (Mumbai) गणेशभक्तांना गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे रात्रभर दर्शन घेता येणार आहे. 

अशी असेल बस सेवा 

४ लि. - डॉ. एम. इक्बाल चौक ते ओशिवरा आगार
८ लि. - जिजामाता उद्यान ते शिवाजी नगर टर्मिनस 
ए-२१ - डॉ. एस.पी.एम. चौक ते देवनार आगार
ए-२५ - बँकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक (सायन)
ए-४२ - पं. पळुस्कर चौक (ऑपेरा हाऊस) ते सँन्डहर्स्ट रोड स्थानक
४४ - वरळी गाव ते एस. यशवंतराव चौक (काळाचौकी) 
५१ - इलेक्ट्रिक हाऊस ते सांताक्रुझ आगार
६९ - डॉ.एस.पी.एम चौक (म्युझियम) ते पी.टी. उद्यान, शिवडी 
६६ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते राणी लक्ष्मीबाई चौक (शिव)

गणेशोत्सवात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा 'ग्रीन कॉरीडोर'

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्वाची तयारी सार्वजनिक मंडळाकडून जोरदार सुरू आहे. यंदाच्या गणेशोत्वात खड्डे त्याच बरोबर वाहतूक कोंडींचा त्रास नागरिकांना होऊ नये. या अनुषंगानं मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी पहिल्यांदाच नवी मुंबईतून मुंबई विमानतळपर्यंत 'ग्रीन कॉरीडोर' ही संकल्पना आखली आहे. तसेच, या 'ग्रीन कॉरीडोर'वरती वाहतुकीचा परिणाम होऊ नये, यासाठी टप्या टप्यावर अधिक मनुष्यबळही तैनात असणार आहे. 

कसा असणार ग्रीन कॉरीडोर?

  • नवी मुंबईहून अटल सेतूद्वारे येणारी वाहनं पीडीमेलो रोडद्वारे सीएसएमटीच्या दिशेनं जातील
  • सीएसएमटीहून ही वाहनं मंत्रालय मार्गे मरीन ड्राईव्ह करत पुढे कोस्टलरोडच्या दिशेने जातील
  • कोस्टलरोडहून पुढे वांद्रे वरळी सीलिंक मार्गे, पश्चिमद्रूतगती मार्गे मुंबई विमानतळाला जाता येणार आहे. 

महत्त्वाची बाब म्हणजे, लालबागच्या राजाच्या दर्शनाला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता. लालबाग उड्डाणपूलाखालील वाहतूक ही बंद केली जाते. यावेळी करीरोडचा नव्यानं झालेला उड्डाणपूल लक्षात घेता. दक्षिण मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावरून येणारी वाहतूक ही लालबाग उड्डाण पुलाखालून भारतमाता सिग्नलहून करी रोडच्या दिशेनं वळवत पुढे ना. म. जोशी मार्गे दक्षिण मुंबईकडे वळवण्यात येणार आहे. शक्यतो भाविकांनी लालबाग राजाच्या दर्शनाला येताना लोकलनं यावं, असं आवाहन पोलिसांनी केलं असून वाहनं घेऊन आल्यास ती वाहनं लोढा पे अॅड पार्क किंवा कल्पतरू पे अॅड पार्कचा वापर करावा. दर्शनासाठी आलेल्यांनी रस्त्यांवर वाहनं उभी करून जाऊ नये, अशा गाड्यांवर कारवाईसाठी मोठ्या संख्येनं टोविंगव्हॅन या परिसरात तैनात राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget